शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उत्स्फुर्त ‘मतदान’साठी सायकल रॅली; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांनी वेधले लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:09 IST

लोकसभेच्या या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी आवाहन करणाºया विविध स्वीप उपक्रमापैकी आज सायकल काढून ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधण्यात आले. ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीव्दारे ठाणेकर सायकलपटूंनी मतदानाचा संदेश ठाणेकरांना दिला. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या सहभागाने या रॅलीला अधिक महत्व आले आणि ठाणेकरांनी त्यास उत्स्फुर्त दाद दिली.

ठळक मुद्देया रॅलीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधण्यात आले

ठाणे : या लोकसभा निवडणुकीतठाणेकर नागरिकांसह जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान करून आपला हक्क बजवावा, या आवाहनासाठी रविवारी सायंकाळी वाहतूक नियंत्रक विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकल रॅली काढली. या रॅलीत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील सायकल चालवून मतदानासाठी ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधले.       लोकसभेच्या या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी आवाहन करणा-या विविध स्वीप उपक्रमापैकी आज सायकल काढून ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधण्यात आले. ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीव्दारे ठाणेकर सायकलपटूंनी मतदानाचा संदेश ठाणेकरांना दिला. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या सहभागाने या रॅलीला अधिक महत्व आले आणि ठाणेकरांनी त्यास उत्स्फुर्त दाद दिली.      सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोरून ही सायकल रॅलीस सुरु झाली. यावेळी जिल्हाधिकारी ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक शैली क्रशनानी यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, ज्येष्ठ सायकलपटू श्यामसुंदर केसरकर, देविदास ठोंबर तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू या ‘मतदान’ जनजागृती सायकल रॅलीत मोठ्यासंख्येने सहभागी झाले. ही सायकल रॅली, कोर्टनाका, टेंभी नाका, जांभळी नाका, गडकरी रंगायतन, राम मारु ती रोड, गोखले रोड, टेलिफ़ोन सर्कल, अलमोडा सिग्नल, खोपट सिग्नल मार्गे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक