शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांबरोबर केक कापणे लिपीकाला पडलं महागात; पालिकेकडून निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 19:52 IST

Disciplinary action with suspension by the municipality : तोच त्याच्या दुसऱ्याच दिवशी फेरीवाल्यांबरोबर केप कापून आपला वाढदिवस साजरा ठाणे महापलिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे.

ठळक मुद्देमाजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सांयकाळी जीवघेणा हल्ला झाला. महापालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईची कुऱ्हाड उगारली गेली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून संबधित लिपिकावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.

ठाणे  : फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला होत नाही. तोच त्याच्या दुसऱ्याच दिवशी फेरीवाल्यांबरोबर केप कापून आपला वाढदिवस साजरा ठाणे महापलिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यावर महापलिका प्रशासनाने शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.         

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सांयकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली. तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईची कुऱ्हाड उगारली गेली आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागात रस्ते, फुटपाथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. परंतु फेरीवाल्यांच्या विरोधात ही कारवाई सुरु असताना नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडीक या लिपिकाचा फेरीवाल्यांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा फोटो सोशल मिडियावर वायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून संबधित लिपिकावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे