शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर डम्पिंग ग्राउंडला पडदा; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:55 IST

जव्हार नगर परिषदेचा केविलवाणा प्रयत्न

जव्हार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी जव्हार येथील पर्यटनस्थळांना भेट देणार असल्याने नगरपरिषदेची तारांबळ उडाली. ऐतिहासिक जुना राजवाडा येथील बायपास राेडवरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असल्याचे समजताच डम्पिंग ग्राउंड आणि रस्त्यावरील घाण दिसू नये म्हणून पडदा लावून ते झाकले हाेते.  जव्हारचा सनसेट पॉइंट पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित आहे. त्याला लागूनच जव्हारचा इतिहास असलेला जुना राजवाडा आहे. सनसेट पॉईटसमोरच डम्पिंग ग्राउंड असून हजारो मेट्रिक टन घनकचरा या भागात दररोज टाकला जातो. मात्र, त्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा रस्त्यावर येतो. परिणामी, नागरिकांना उग्र वास सहन करावा लागतो. मात्र, मुख्यमंत्र्यांची धास्ती घेत नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावरील कचरा साफ केला आणि भला मोठा पडदा लावून डम्पिंग लपवण्याचा प्रयत्न केला. घनकचऱ्याची विल्हेवाट लावली असती, तर ही वेळ ओढवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे