ठाणे: सागरी किनारा संरक्षण (सी.आर.झेड.) कायदा ९-२-१९९१ पासून अस्तित्वात आला. त्यानतंर तब्बल १० वर्षांनी म्हणजे २-११-२०११ पासून सुधारित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी शासनाने सुरु केली. ब्रिटिश सरकारचे जुने नकाशे व आता सॅट लाइटच्या मदतीने तयार झालेले नवे नकाशे नवा कायदा बनवताना शासन आधारभूत मानणार आहे. याबाबत नागरिक ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात लिखित स्वरूपात सोमवार, १५ जानेवारीपर्यंत आपल्या सूचना - हरकती नोंदवू शकतात असे प्रतिपादन ठाण्याचे वास्तुविशारद मुकुंद गोडबोले यांनी सांगितले.सी.आर.झेड २ अंतर्गत ठाणे पूर्वेचा परिसर किती बाधीत होऊ शकतो या जिव्हाळ््याच्या प्रश्नावर सी.आर.झेड. कायद्यातील प्रस्तावित बदल ठाण्यातील कोपरीकरांना किती फायदेशीर या विषयावर पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेंशनच्या माध्यमातून मुकुंद गोडबोले बोलत होते. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व या संस्थेने अष्टविनायक चौक, ग. मो.कोळी मार्ग, ठाणे पूर्व येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या भाषणास ठाणेकरांच्या उत्तम प्रतिसाद लाभला. नव्या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर अंदाजे ७० टक्के ठाणे पूर्व परिसर सी.आर.झेड. क्षेत्राच्या बाहेर येण्याची शक्यता त्यांनी शेवटी वर्तवली. या प्रगंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नव्या सी.आर.झेड कायद्यांचे पूर्व ठाणेकर स्वागत करतील. त्यातून पूर्वेला तुमच्या सहकार्याने आपण आदर्श नगरीची उभारणी करू या व आपले अनेक वर्षाचे स्वप्न साकार करू या. याप्रसंगी आ. रविंद्र फाटक, जिल्हा प्रमुख (कल्याण) गोपाळ लांडगे, नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर (गायकवाड), नगरसेविका नम्रता पमनानी आदी उपस्थित होते. शिवसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर माजी नगरसेवक गिरीश राजे यांनी सूत्रसंचालन केले.
सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 16:31 IST
सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे ठाण्यात खाडी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे.ठाण्यातील खाडी किनाऱ्यावरील ठाणेकरानसाठी या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते समजण्यासाठी शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने सीआरझेड कायद्यातील प्रस्तवित बदल ठाण्यातील कोपरीकरांसाठी किती फायदेशीर याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन
ठळक मुद्दे१५ जानेवारीपर्यंत आपल्या सूचना - हरकती नोंदवू शकतात - मुकुंद गोडबोले पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेंशनच्या माध्यमातून मार्गदर्शन नव्या सी.आर.झेड कायद्यांचे पूर्व ठाणेकर स्वागत करतील - पालकमंत्री