सरस्वती हत्याकांडातील आरोपी क्रूरकर्मा साने हा वासनांध 

By धीरज परब | Published: June 18, 2023 02:10 PM2023-06-18T14:10:07+5:302023-06-18T14:13:52+5:30

कोणत्यातरी कारणावरून दोघांच्या मध्ये वाद  झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. 

cruel sane the accused in the saraswati murder case is a lustful man | सरस्वती हत्याकांडातील आरोपी क्रूरकर्मा साने हा वासनांध 

सरस्वती हत्याकांडातील आरोपी क्रूरकर्मा साने हा वासनांध 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोड मधील सरस्वती हत्याकांडातील आरोपी मनोज साने (५६) हा क्रूरकर्माच नसून वासनांध देखील आहे. सरस्वतीचे तुकडे करण्या आधी तीच्या विवस्त्र मृतदेहा सोबत त्याने स्वतः देखील नग्न होऊन छायाचित्रे काढली. नंतर त्याने पॉर्न व्हिडीओ पाहिला.  दरम्यान मोबाईल पडताळणी मध्ये साने याला १० वर्षांपासून माहिती का लपवली ? असा सवाल सरस्वतीने केला होता. त्यामुळे साने ह्याने त्याला असलेल्या लैंगिक आजाराची माहिती लपवण्यासह त्याचे अन्य महिलांशी चालणारे चॅटिंग आदिपैकी कोणत्यातरी कारणावरून दोघांच्या मध्ये वाद  झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. 

सरस्वती हत्याकांडाचा आरोपी मनोज साने हा क्रूरकर्मा आहेच पण वासनांध आणि धूर्त देखील आहे. सरस्वतीची हत्या आपण केली नाही तर तिने विष पिऊन आत्महत्या केली असे साने हा पोलिसांना सातत्याने सांगतोय. मात्र विषारी कीटकनाशक हे साने यानेच बोरिवलीच्या बाभई येथील आदर्श नर्सरी मधून खरेदी केले.  सानेच्या घरातून सापडलेली कीटकनाशकची बाटली ही त्याच दुकानातून खरेदी केल्याचे बाटली वरील बॅच क्रमांक वरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साने याने सरस्वतीला विषारी द्रव्य देऊन मारल्याची दाट शक्यता असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. 

मनोज साने याने ४ जून रोजी सरस्वतीच्या विवस्त्र मृतदेहा सोबत स्वतः देखील नग्न होऊन छायाचित्रे काढली. पॉर्न व्हिडीओ पाहिला. नंतर त्याने ऑनलाईन पाहून इलेक्ट्रिक करवत खरेदी केली व त्याने सरस्वतीचे तुकडे केले. साने ह्याने तुकडे शिजवून थोडेथोडे करून तो बाहेर टाकून येत होता. पोलिसांना पुरावे सापडू नये म्हणून प्लास्टिक पिशवीत भरलेले तुकडे पिशवीसह न टाकता ते पिशवी उघडून टाकायचा.  अश्या पद्धतीने पूर्ण मृतदेहाची तो विल्हेवाट लावणार होता. त्यात तो यशस्वी झाला असता तर सरस्वतीच्या  निर्घृण हत्याकांड चा थांगपत्ता लागला नसता. परंतु शेजारी राहणाऱ्या तरुणास ६ जून रोजी साने याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले आणि त्याने नया पोलिसांना कळवल्याने हे हत्याकांड उघडकीस आले.

साने याची जेजे रुग्णालयात सुरू आहे मनोवैज्ञानिक चाचणी 

आरोपी साने याने अतिशय नियोजनबद्ध पणे कटकारस्थान करून सरस्वती वैद्य हत्याकांड घडवून आणले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तो पोलिसांना तपासात सहकार्य न करता दिशाभूल करणे, खोटी माहिती देणे आदी प्रकार करत आहे. त्यामुळे पोलिसांनी साने याची मुंबईच्या जे जे रुग्णालयात गुरुवार पासून मनोवैज्ञानिक चाचणी सुरू आहे. गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस चाचणी झाली असून. आता सोमवारी पुन्हा चाचणी साठी नेण्यात येणार आहे.

Web Title: cruel sane the accused in the saraswati murder case is a lustful man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.