शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर गर्दी-गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:40 IST

ज्येष्ठांचे झाले अतोनात हाल : महापौर नरेश म्हस्के यांना मागावी लागली नागरिकांची माफी

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे  : सोमवारी पहिल्या दिवशी लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी ठाण्यात महापालिकेने सुरू केलेल्या अनेक केंद्रांवर गोंधळ, गर्दी आणि नियोजनाचा अभाव दिसला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक चांगलेच संतापले होते. एकीकडे उन्हाच्या झळा, त्यात बसण्यासाठी खुर्च्यांचा अभाव, पिण्यास पाणी नाही.  अशातच सकाळी १० वाजल्यापासून बसूनही लसीकरणासाठी अनेकांना तीन तास ताटळकत थांबावे लागले. कोपरी लसीकरण केंद्रावर हा गोंधळ अधिक होता. त्याठिकाणी महापौर नरेश म्हस्के यांना ज्येष्ठ नागरिकांनी घेराव घातला. यामुळे महापौरांवर त्यांची माफी मागण्याची वेळ आली.ठाणे  महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या १५ केंद्रावर ती सुरू झाली आहे. मंगळवारी दुसऱ्या  दिवशी सकाळी १० वाजल्यापासून बहुसंख्य केंद्रावर ज्येष्ठांच्या रांगा होत्या. महापालिकेने १२ ते ५ ही वेळ निश्चित केली असली तरी आपला क्रमांक पहिला लागावा यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रत्येक केंद्रावर वेळेत हजर असल्याचे दिसले. परंतु, पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका त्यांना बसला.  ज्येष्ठांबरोबर अनेक केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्सने देखील गर्दी केल्याने आधी येऊनही ज्येष्ठांना या वर्कर्सनंतर लसीकरण केले जात होते. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. कोपरीच्या केंद्रावरही उडाला मोठा गोंधळ nकोपरी येथे आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून ज्येष्ठांनी रांगा लावल्या होत्या. परंतु लसीकरणाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. विशेष म्हणजे आधी लखीचंद फतीचंद येथे हे लसीकरण करण्यात येत होते. nमंगळवारी ठिकाण बदलल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय महापौर येणार म्हणून ते आल्यानंतर लसीकरण सुरू केले. त्यामुळे ज्येष्ठांनी याचा राग थेट त्यांच्यावरच काढला. nसकाळपासून रांगेत उभे असताना साधे पाणी नाही, बसण्यासाठी खुर्च्या नाहीत, उन्हातान्हात बाहेरच रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महापौरांना त्यांची माफी मागावी लागली. बसण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगून खुर्च्या आणि पाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले. आधी लखीचंद फतीचंद केंद्रावर लसीकरण सुरू होते. एका दिवसात केंद्र का बदलले? सकाळपासून येथे ज्येष्ठ नागरिक आले असून त्यांच्यासाठी पाण्याची, बसण्यासाठी व्यवस्था केली नाही. महापालिकेने किमान या गोष्टींकडे तरी गांभीर्याने पाहणे गरजेचे होते.- भरत चव्हाण, स्थानिक नगरसेवककेंद्रावर गोंधळ झाल्याचे, सुविधा मिळत नसल्याचे मी मान्य करतो. ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने अडचण झाली. दुसरा डोस घेण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स आल्याने गोंधळ उडाला. यावर तोडगा काढला जाईल. ज्येष्ठांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो.  - नरेश म्हस्के, महापौर

ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन लसीकरणासाठी ज्या ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे, त्या ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याचे चित्र मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशीही दिसले. त्यामुळे नोंदणी करण्यासही उशीर लागत होता. त्यामुळे खील अनेक ठिकाणी रांगा लागल्या.