शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या रेटारेटीत डोंबिवलीत गरोदर मातेने दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 21:05 IST

फलाट क्रमांक ३ वरची घटना; माता, बाळ सुखरुप

ठळक मुद्देबाळासह मातेला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.तेथे त्या दोघांवर औषधोपचार सुरु असून ते सुखरूप असल्याचे महिलेचे दीर नामे सुलेमान शेख यांनी सांगितले.

डोंबिवली - खच्चून भरलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात पाय ठेवायला जागा नसतांनाच एवढ्या प्रचंड गर्दीत फलाट क्रमांक ३ वर उतरलेल्या एका गरोदर मातेला प्रसुतिच्या वेदना असह्य झाल्या. त्यामुळे फलाटामध्ये उपस्थित असलेल्या महिला रेल्वे पोलीस, प्रवास करणा-या नर्स आदींनी तातडीने आडोसा करत जागा करुन त्या महिलेची प्रसुति केली. महिलेने मुलाला जन्म दिला, आणि त्यानंतर अल्पावधीतच लोहमार्ग पोलीसांनी बाळासह मातेला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची घटना बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.जास्मीन शब्बीर शेख (२९)रा. गुप्ते नगर ,वावेघर ,चाळ क्रमांक३, खोली क्रमांक १२, खडवली, पूर्व असे त्या गरोदर मातेचे नाव आहे. जास्मीन दिरासह खडवली स्थानकातून बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या लोकल मधुन कामा हॉस्पिटल, मंबई येथे जात होती. ती लोकल डोंबिवली स्टेशन येथे अली आसता त्याना प्रसुतिच्या वेदना जास्त प्रमाणात होऊ लागल्याने ती तिचे दिरासह डोंबिवली स्टेशन प्लॅटफॉर्म न ३ वर उतरली. त्यावेळी गरोदर मातेला मदत करण्यासाठी स्थानकातील महिला, पुरुष लोहमार्ग पोलीसांनी आडोसा बघत जागा केली. फलाटातील सह महिला प्रवाशांनी तातडीने प्रसंगावधान राखले, त्यातच दोन प्रवासी नर्स म्हणुन जात होत्या, त्यांनीही महिलेची अवस्था बघत तात्काळ प्रथमोपचार केले, तेवढ्यात प्रस्तुती झाली, जास्मीनने गोंडस मुलाला जन्म दिला. लोहमार्ग पोलीसांनी तातडीने गरोदर मातेस व नवजात बाळाला शात्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली येथे उपचारार्थ दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी दिली. तेथे त्या दोघांवर औषधोपचार सुरु असून ते सुखरूप असल्याचे महिलेचे दीर नामे सुलेमान शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसीPoliceपोलिसdombivaliडोंबिवली