शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या खासगीकरण धोरणांविरोधात सीआरएमएसचे उद्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 17:35 IST

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची इमारत हेरिटेज दर्जाच्या नावाखाली तात्काळ रिकामी करून त्या जागी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा घाट घातला जाणार आहे.

डोंबिवली: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची इमारत हेरिटेज दर्जाच्या नावाखाली तात्काळ रिकामी करून त्या जागी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा घाट घातला जाणार आहे. तशी आॅर्डर देखील रेल्वे बोर्डाने काढली आहे. सध्या मुंबईत जीएम बिल्डिंगमध्ये वस्तुसंग्रहालय आहे, तेथे अभावानेच पर्यटक जातात. अन्य प्रवासी केवळ फोटोसेशन करतात. त्यातच आता तेथे शेकडो रेल्वे कर्मचारी, अधिकारी आदींचा वावर असल्याने त्या इमारतीची वेळच्या वेळी देखभाल केली जात आहे. त्यामुळे ती इमारत जैसे थे ठेवावी असा पवित्रा घेत त्या मागणीसाठी महाव्यवस्थापक कार्यालयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.परेल वर्कशॉप रिकामे करायचे, कुर्ला येथील रेल्वेची वसाहत रिकामी करायची हा प्रकार न समजण्यासारखा असून बिल्डरांच्या घशात या जमिनी देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय असल्याने त्याचाही निषेध करण्यात येणार आहे. मजदूर संघाचे सुनील बेंडाळे(कल्याण), डॉ. प्रवीण बाजपेयी(मुंबई) आदींनी मंगळवारच्या मोर्चा संदर्भात लोकमतला माहिती दिली. ते म्हणाले की, सातत्याने विविध प्रस्तावांच्या माध्यमाने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करणे हे केंद्रातील रेल्वे मंत्रालयांचे कार्य दिसते. या ठिकाणी दोन-चार भेटीत त्यांनी महाव्यवस्थापकांच्या वास्तूमध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय निर्माण करण्याचा चंग बांधला, पण ती जागा संग्रहालयासाठी पुरेशी नाही. त्यासाठी अन्यत्र जागा निवडावी आम्ही त्यांचे समर्थन करू. पण वस्तुसंग्रहालयाच्या नावाखाली भविष्यात हॉटेल देखिल उघडले जाऊ शकते असे नियोजन असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.बेंडाळे म्हणाले की, खासगीकरणाच्या दिशेने रेल्वे कर्मचा-यांचा बळी दिला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. रेल्वे मंत्रालयाच्या मनमानी कारभाराचा सीआरएमएस निषेध करत असून त्यांचे हे डाव उधळून लावले जातील असेही ते म्हणाले. वाजपेयी म्हणाले की, मंगळवारच्या मोर्चाला युनियनसह कुर्ला व परेल येथिल रेल्वेचे सुमारे तीन हजार कर्मचारी आंदोलनाला सहभागी होतील. त्या सगळयांचे नेतृत्व सीआरएमस मुंबई मंडल, ठाणे व कल्याण भागातील पदाधिकारी करणार आहेत. हा मोर्चा झाल्यानंतर आगामी काळात दिल्लीमध्ये रेल्वे मंत्रालयावरही मोर्चा काढणे, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जीएम बिल्डिंगचे म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा निर्णय ज्या समितीने घेतला आहे त्यांचा प्रामुख्याने निषेध करण्यात येणार असून त्यांच्या निर्णयाला विरोध करणे हा मोर्चाचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली