शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: उल्हासनगरात ‘पठाणी’ कर्जाला कंटाळून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 09:49 IST

Crime News: या महिलेने घरसंसार चालविण्यासाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. काही वर्षांत २० हजार रुपयांचे लाखो रुपये व्याज देऊनही रक्कम शिल्लक असल्याचा तगादा व्याजखोरांनी लावला होता.

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. एक परिसरातील रोहिणी अन्सारी या महिलेने व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ आहेत. व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून गिरीष चुग याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ व्हायरल करून आपबीती सांगितल्याची घटना घडली होती.

अन्सारी या महिलेने घरसंसार चालविण्यासाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. काही वर्षांत २० हजार रुपयांचे लाखो रुपये व्याज देऊनही रक्कम शिल्लक असल्याचा तगादा व्याजखोरांनी लावला होता. या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २७ जानेवारी रोजी कर्जावरील व्याज घेण्यासाठी आलेल्या महिलेसमोर त्रासलेल्या अन्सारी हिने पुन्हा आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तेव्हा पैसे वसुलीकरिता आलेल्या महिलेने ‘आमचे पैसे दे व मग आमच्यासमोर फाशी घे,’ असा उफराटा सल्ला दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून, अन्सारीने व्हायरल केला. त्यानंतर त्रासलेल्या अन्सारीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवरा वेळेत घरी आल्याने त्याने रोहिणीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यापूर्वी उल्हासनगर पोलिस ठाण्यात व्याजखोरांच्या त्रासाची तक्रार केली होती, असे रोहिणी अन्सारी हिचे म्हणणे आहे. याबाबत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फुलपगारे यांच्याशी संपर्क केला असता, याबाबत कोणतीही माहिती नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

शहरात पसरली संतापाची लाट गिरीष चुग व रोहिणी अन्सारी यांच्याबाबतीत घडलेल्या दोन्ही घटनांबद्दल शहरात संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी सोशल मीडियावरून होत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरमहा ४० टक्के व्याजदराने घेतले होते कर्ज शहरातील कॅम्प नं. पाच येथे राहणाऱ्या गिरीष चुग याला दोन महिन्यांपूर्वी सहकाऱ्याच्या चुगलीमुळे गारमेंट दुकानाच्या मालकाने कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे बेकार झालेल्या गिरीशने घरसंसार चालविण्यासाठी काही जणांकडून दरमहा ४० टक्के व्याजाने कर्ज घेतले. मात्र, घेतलेले कर्ज वेळत दिले नाही म्हणून पैसे देण्याचा तगादा व्याजखोरांनी लावला. हा सर्व प्रकार घरापर्यंत गेल्यावर गिरीशने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये पत्नीची माफी मागून दोन मुलांचा व वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची विनंती केली. तसेच पठाणी व्याजाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगताना व्याज वसुलीकरिता छळ करणाऱ्यांची नावे व्हिडीओमध्ये सांगितली. या प्रकाराची माहिती स्थानिक हिललाइन पोलिसांना नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर