शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या चार नगरसेविकांवर गुन्हा, अटकेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 02:04 IST

मीरा रोडच्या शांतीनगर भागात पालिकेच्या जलकुंभाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या रुपाली मोदी, हेतल परमार, वंदना भावसार, सीमा शाह या चार नगरसेविकांसह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर यांच्यावर नयानगर पोलिसांनी दंगल, मारहाण आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर भागात पालिकेच्या जलकुंभाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या रुपाली मोदी, हेतल परमार, वंदना भावसार, सीमा शाह या चार नगरसेविकांसह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर यांच्यावर नयानगर पोलिसांनी दंगल, मारहाण आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.शांतीनगर सेक्टर दोनमधील मैदानात पालिकेने बांधलेल्या जलकुंभाच्या गुढीपाडव्याला झालेल्या उद््घाटनावेळी श्रेयावरून हा वाद उद््भवला होता. भट यांचा फलक काढल्याने त्यांनी जाब विचारला. त्यांच्यासोबतच्या काही महिला उद्घाटन करण्यासाठी गेल्या आणि सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान धक्काबुक्की व हाणामारीत झाले. पोलीस आल्यानंतर वाद सोडवण्यात आला.भट यांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून पोलिसांनी भाजपाच्या चार नगरसेविकांसह एक माजी नगरसेविका आणि एक पदाधिकारी अशा सहा जणींविरुध्द सोमवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. भट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.स्थानिक भाजपा नगरसेवकांकडून नेहमीच डावलले जाते, कामात अडथळे आणले जातात, असे फिर्यादीत नोंदवण्यात आले आहे. त्याचा संदर्भ आमदार सरनाईक यांनीही दिला आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिष्टाचार पाळला नसल्याचा मुद्दा मांडला. शिवसेनेचे आमदार, खासदार यांना डावलण्यात आल्याचे ते म्हणाले. नयानगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हे