शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रक्तदानाने केले नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:40 IST

गुन्हे अन्वेषणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह ९७ पोलिसांनी गुरुवारी रक्तदान करुन नववर्षाचे स्वागत केले.

ठळक मुद्दे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह ९३ पोलिसांचा समावेश पोलीस आयुक्तांनी दिली शाबासकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गुन्हे अन्वेषणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह ९७ पोलिसांनी गुरुवारी रक्तदान करुन नववर्षाचे स्वागत केले. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, अशी शाबासकी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली.राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर ठाण्यात याआधी सुमारे १५० पोलिसांनी रक्तदान केले. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी पुन्हा सिद्धी सभागृह येथे गुन्हे अन्वेषण विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना फणसळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले,सध्या थॅलेसिमियासारख्या आजाराला तसेच कोविडमुळे उद्भवणाºया आजारांमध्येही अनेकदा रक्ताची गरज भासते. आपल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून पोलिसांनीही रक्तदानासारख्या उपक्रमात सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. ठाण्यात रोटरीसारख्या संस्था असे उपक्रम निरंतर राबवितात. पोलिसांनीही योगदान देऊन आपला खारीचा वाटा उचलणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. या शिबिरामध्ये शंभर हून अधिक पोलीस कर्मचाºयांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला होता. परंतू, २० ते २५ कर्मचाºयांना रक्तदाब, मधुमेह आणि हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्यासह ९७ पोलिसांनी रक्तदान केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकPoliceपोलिस