शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे विरोधात अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:38 IST

पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण करणा-या ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा कळव्यातील नगरसेवक गणेश कांबळे याच्याविरोधात शुक्रवारी मध्यरात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गणेश याच्यासह त्याचे वडील मलिकार्जुन आणि भाऊ केतन या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण करणा-या ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा कळव्यातील नगरसेवक गणेश कांबळे याच्याविरोधात शुक्रवारी मध्यरात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गणेश याच्यासह त्याचे वडील मलिकार्जुन आणि भाऊ केतन या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामुळे गणेश याच्या अडचणीत वाढल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.नगरसेवक गणेश याने मारहाणीनंतर तक्र ार नोंदविण्यासाठी त्याची पत्नी कॅरलीन कांबळे या कळवा पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, कांबळे याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्र ार नोंदवून घेण्यासाठी कळवा पोलिसांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि लग्नाच्या प्रमाणपत्राची मागणी केली, असा आरोप त्यांनी केला होता. कॅरलीनच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धाव घेऊन ठाण्यात पत्रकार परिषद घेतली होती.दरम्यान,शहर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश कळवा पोलिसांना दिले होते. त्यानुसार,शुक्र वारी सायंकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्र ार नोंदविली. यामध्ये गणेश कांबळे याने मारहाण, शारीरिक तसेच मानिसक छळ आणि दागिन्यांचा अपहार, अत्याचार केल्याचा आरोप कॅरलीन यांनी केला आहे. या घटनेने कळवा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.सासरे,दिराकडूनही छळसासरे मलिकार्जून आणि दीर केतन या दोघांनीही शारीरिक तसेच मानिसक छळ केल्याचा आरोपही त्यांनी त्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बगडे यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा