शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन भागात तीन मच्छीमारांच्या घरात चोऱ्या करणाऱ्यास गुन्हे शाखेने केली अटक

By धीरज परब | Updated: February 2, 2025 16:31 IST

Bhayandar News: भाईंदरच्या उत्तन भागातील मच्छीमारांच्या घरांना लक्ष्य करत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने अटक करून ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत . 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागातील मच्छीमारांच्या घरांना लक्ष्य करत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने अटक करून ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

मीरा भाईंदर शहरातील सर्वात कमी गुन्हे होत असलेल्या उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने मच्छीमारां मध्ये खळबळ उडाली होती. कोळीवाड्यात मच्छीमार हे त्यांच्या घरांना कडी लावून वा दार नुसते ओढून घेत त्यांच्या मासेमारी संबंधित वा घराशी संबंधित कामांना जात असतात.

मच्छीमारांच्या ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन पाळत ठेऊन चोऱ्या होऊ लागल्या . ह्या वाढत्या चोरी प्रकरणी उत्तन पोलीस तपास करत असतानाच वरिष्ठांच्या निर्देशा नुसार मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे, उपनिरीक्षक संदीप शिंदे सह अशोक पाटील, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संजय शिंदे, संतोष लांडगे, मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, प्रशांत विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे, किरण असवले व संतोष चव्हाण यांच्या पथकाने विविध दिशेने घरफोड्यांचा तपास सुरु केला.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीवरुन पोलिसांनी सुहेल जमील सिध्दीक्की ( वय २५ वर्षे )  रा. भवनस् कॉलेज जवळ, अंधेरी पश्चिम ह्याला ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले . सुहेल हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याच्या कडे कसून तपास केल्या नंतर उत्तन भागात त्याने ३ मच्छीमारांच्या घरात चोऱ्या केल्याचे उघडकीस आले. 

४ डिसेम्बर २०२४ रोजी हॅरल फ्रेडी बुनकवली रा. भाटेबंदर लाईट हाऊस जवळ हे जाळी विणण्यासाठी तर महिला वर्ग मासे सुकवण्यासाठी घराला कडी लावून गेले होते . त्यावेळी कडी उघडून चोरट्याने २ मोबाईल व कपाटाजवळ ठेवलेल्या चावीने कपाट उघडुन ३ सोन्याच्या अंगठ्ठया असा २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता . 

१२ डिसेम्बर रोजी मोठा गाव येथील विल्बन इजिदोर बांड्या यांच्या आई दाराला कडी लावून शेजारी गेल्या असता घरातील २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरून नेले होते . तर मस्जिद गल्ली , मोठा गाव येथील  वेलरीन मानको  ह्या २७ जानेवारी रोजी सायंकाळी घराचा मागचा दरवाजा उघडा ठेऊन व पुढील दरवाजा ओढून घेत वळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या . त्यावेळी कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते .  ह्या तिन्ही चोऱ्या सुहेल ह्याने केल्याचे कबूल केले आहे .  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर