लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील लोकमान्यनगर, इंदिरानगर भागात चालणा-या आॅनलाईन जुगार अड्डयावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री धाड टाकून १५ जणांना अटक केली. यामध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांना ठाण्यातील लोकमान्यनगर, इंदिरानगर भागात आॅनलाईन जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोकमान्यनगर पाडा क्र. तीन येथील जुगार अड्डयावरुन चौघांना तर वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील इंदिरानगर येथील अड्डयावरुन ११ जणांना ताब्यात घेतले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे धाडसत्र राबविण्यात आले. या धाडसत्रात माजी नगरसेविका राधा फतेबहाद्दूर यांच्या मुलालाही अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत वर्तकनगर आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.
ठाण्यात आॅनलाईन चालणाऱ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:51 IST
शहरातील आॅनलाईन चालणा-या जुगार अड्डयांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये माजी नगरसेविकेच्या मुलालाही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात आॅनलाईन चालणाऱ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेची कारवाई
ठळक मुद्दे १५ जणांना अटकमाजी नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश वागळे इस्टेट आणि वर्तकनगरमध्ये गुन्हे दाखल