शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पीएफमध्ये अफरातफर, सहा कंपन्यांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:26 IST

कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेमध्ये जमा करण्यास दिरंगाई करणाºया सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ लाख ६५ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.

ठाणे - कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्धारित वेळेमध्ये जमा करण्यास दिरंगाई करणाºया सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ लाख ६५ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.भविष्य निर्वाह निधीपोटी कर्मचाºयांच्या वेतनातून १२ टक्के कापून कंपन्यांनी स्वत:चीही तेवढीच रक्कम स्टेट बँकेत प्रत्येक महिन्यामध्ये १५ तारखेच्या आत आॅनलाइन पद्धतीने भरण्याचा नियम आहे. काही कंपन्यांनी कर्मचाºयांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीपोटी रक्कम कपात केली; मात्र बँकेमध्ये ती जमा केली नाही. या कंपन्यांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले. यात डोंबिवली येथील मे. राज फॅब्रिकेशन वर्क्स कंपनीने डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत २८ हजार २१५ रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. भिवंडी येथील मे. प्रेसिडेन्सी स्कूलने जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत चार लाख ५१ हजार ८० रुपयांची, कोहिनूर डाइंग अ‍ॅण्ड प्रिंटिंग वर्क्सने एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत दोन लाख ३५ हजार २९३ रुपयांची, आसनगाव येथील मे. दमसा विद्युत अप्लायन्सेस प्रा.लि.ने डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत ८१ हजार २५ रुपयांची, ठाणे पश्चिम येथील मे. बी.एच. कन्स्ट्रक्शन्सने डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत ६० हजार ४० रुपयांची, तर ठाणे पूर्व येथील मे. हिनल कन्सल्टन्सी अ‍ॅण्ड सर्व्हिसेसने डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत नऊ हजार ३६५ रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. ही कारवाई कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या सहायक आयुक्त उषा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवर्तन अधिकारी मुकुंदा सदावर्ते, यांनी केली. कामगारांनी संपर्क साधण्याचे आवाहन ठाण्याचे आयुक्त सुधीर गणवीर यांनी केले आहे.पीएफपोटी कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केली जाणारी रक्कम आणि कंपन्यांनी स्वत: भरावयाचा वाटा निर्धारित वेळेमध्ये कर्मचाºयांच्या खात्यात जमा करणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी या कार्यालयाने झीरो डिफॉल्ट योजना अमलात आणली असून त्याअनुषंगाने कंपन्यांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाProvident Fundभविष्य निर्वाह निधीnewsबातम्या