शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 16:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मीटरशिवाय घरगुती वापरासाठी बेकायदेशीरपणे वीजेची चोरी करणाºया श्रीगुरु मलिक (४०, रा. वागळे इस्टेट, ठाणे ...

ठळक मुद्दे वीज वितरण कंपनीने केली कारवाई अनधिकृतपणे घरगुती वापरासाठी घेतले कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मीटरशिवाय घरगुती वापरासाठी बेकायदेशीरपणे वीजेची चोरी करणाºया श्रीगुरु मलिक (४०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) यांच्याविरुद्द वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वीज चोरीच्या बिलाचा भरणा न केल्याने कंपनीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी गुरुवारी दिली.ठाणे पश्चिमेतील हनुमाननगर येथील मलीक यांनी मीटर न लावताच अनधिकृतपणे वीज पुरवठा घेतल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे वागळे इस्टेट उपविभागाचे सहायक अभियंता किशोर आसरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी २ वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर येथील वंदेमातरम चाळीत त्यांच्या घराजवळ तपासणी केली. तेंव्हा ३०० युनिटची वीज चोरी करुन तीन हजार ७२० रुपयांची वीज विनापरवाना घेतल्याचे आढळले. या वीज चोरीचे त्यांना दोन हजारांचे बिलही कंपनीने दिले. मात्र, या बिलाचा त्यांनी २८ डिसेंबरपर्यंत भरणाच केला नाही. अखेर याप्रकरणी सहायक अभियंता आसरे यांनी कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी