शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा; आणखी सहा जणांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 06:27 IST

व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा  दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (डीजी) संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्य या आरोपांवरून ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा  दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला.

पुनामिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मे २०२१  ते ३०  जून २०२४ या कालावधीत यातील कथित आरोपींकडून आपण त्रास सहन केला. या तक्रारीमध्ये पांडे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, पोलिस निरीक्षक  मनोहर पाटील, तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांचा समावेश आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, आरोपींनी ठाणे नगर पोलिसांकडे २०१६  मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केस दाखल करण्याच्या धमक्या दिल्या, पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तवेज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

या कलमांन्वये झाला गुन्हा दाखल१६६(अ) आणि १७० (शासकीय कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण), १२० बी (फौजदारी कट), १९३ (खोट्या पुराव्यांची निर्मिती), १९५, १९९, २०३, २०५, आणि २०९ (खोटे विधान आणि न्यायालयाच्या कार्यात अडथळा), ३५२ आणि ३५५ (हल्ला), ३८४ आणि ३८९ (जबरदस्ती), ४६५, ४६६, आणि ४७१ (खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर) आदी कलमांचा समावेश आहे. ही तक्रार ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी ई-मेलद्वारे पुनामिया यांनी दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस