शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अपसंपदा बाळगल्याप्रकरणी ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासह 19 जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 04:25 IST

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चव्हाण यांनी अधिकृत स्त्रोतापेक्षा ४१ टक्के जादा मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यासह 19 जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी ही कारवाई केली.

ठळक मुद्दे पत्नी, सासू, सासऱ्यांसह ठामपातील अधिका-यांचाही समावेशनिरंजन हिरानंदानींसह १० बांधकाम व्यावसायिकांवरही आरोप नगरसेवक पदाच्या कालावधीत जमवली बेहिशेबी संपत्ती

ठाणे  - बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी ज्ञात स्त्रोतापेक्षा सुमारे ४१ टक्के जादा संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुरुवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची पत्नी, सासू, सासरे अशा 19 जणांविरुद्ध त्यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.बिल्डर सूरज परमार यांची ७ आॅक्टोंबर २०१५ रोजी आत्महत्या झाली होती. याप्रकरणी तत्कालीन नगरसेवक सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण, राष्टÑवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि ठामपातील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात या चौघांविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यानंतर याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते यांच्यासह १६ जणांच्या पथकाने गुरुवारी दिवसभर वेगवेगळया ठिकाणी धाडसत्र राबवून हा गुन्हा दाखल केला. नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याविरुद्ध यापूर्वीच अपसंपदा बाळगल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.एप्रिल १९९२ ते आॅक्टोंबर २०१५ या नगरसेवक पदाच्या कालावधीत सुधाकर चव्हाण यांनी दहा कोटी ९६ लाख ५१ हजार ५०२ रुपये इतकी अधिकृत उत्पन्नापेक्षा ४१ टक्के जादा अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. यामध्ये त्यांना सहाय्य करणारी त्यांची पत्नी सुलेखा सुधाकर चव्हाण, सासू मनोरमा शिवाजी सूर्यवंशी, सासरे शिवाजी सूर्यवंशी, मेव्हणा विलास शिवाजी सूर्यवंशी, संगीता विलास सूर्यवंशी (मेव्हण्याची पत्नी) आदी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर चव्हाण यांच्या शिवाईनगर येथील मंत्रांजली बंगला, मीरा रोड आणि नरीमन पाँर्इंट येथील वेगवेगळया ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र राबविले.  

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस