शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटवर सट्टा: अभिनेता अरबाज खान अडचणीत येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:01 IST

क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी अभिनेता सलमानचा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून केली जाणार आहे. याबाबत त्याला हजर होण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली आहे.

ठळक मुद्देठाण्याचे खंडणी विरोधी पथक करणार चौकशीदोन कोटी ८० लाखांचा सट्टाबुकीने दिली माहिती

ठाणे: ‘आयपीएल’ क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर आता अभिनेता सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान याचीही चौकशी केली जाणार आहे. सोनूकडे मिळालेल्या काही माहितीच्या आधारे त्याला ठाणे पोलिसांनी शनिवारी हजर होण्याची नोटिस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.जलाल याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला. त्यात तो आतापर्यंत दोन कोटी ८० लाख रुपये हारला. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी अरबाजकडे जलालने तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. त्यातूनच त्याला जलालने धमक्या दिल्या होत्या. सोशल मिडियातून अरबाज आणि जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाईलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसमवेत मिळाले. तिच्याच आधारे ठाण्याचे खंडणी विरोधी पथक आता अरबाजकडे चौकशी करणार आहे. त्याने नेमकी किती पैशांचा सट्टा लावला? त्यातील किती पैसे देणे बाकी आहेत? या सर्व बाबींची त्याच्याकडे चौकशी करण्यासाठीच त्याला २ जून रोजी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटिस बजावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले.क्रिकेटवर सट्टा लावणारे देशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाली होती. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैद्राबाद सुपरकिंग्ज असा सामना रंगला होता. याच शेवटच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील ९८ बुकी हे जलालच्या संपर्कात होते. हीच माहिती त्याच्याच साथीदारांकडून उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी