ठाण्यात अजेय संस्थेच्यावतीने 26 जानेवारी रोजी रंगणार सृजनोत्सव एकदिवसीय संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 04:51 PM2020-01-16T16:51:57+5:302020-01-16T16:54:55+5:30

अजेय संस्था आयोजित सृजनोत्सव एकदिवसीय संमेलन ठाण्यात रंगणार आहे. 

Creation Festival One-Day Meeting to be held on January 26 on behalf of invincible organization in Thane | ठाण्यात अजेय संस्थेच्यावतीने 26 जानेवारी रोजी रंगणार सृजनोत्सव एकदिवसीय संमेलन

ठाण्यात अजेय संस्थेच्यावतीने 26 जानेवारी रोजी रंगणार सृजनोत्सव एकदिवसीय संमेलन

Next
ठळक मुद्देठाण्यात रंगणार सृजनोत्सव एकदिवसीय संमेलनअभिनेता निखिल राऊत आणि अभिनेत्री अश्विनी कासार ह्यांच्या हस्ते उद्घाटनअजेय संस्था आयोजित सृजनोत्सव

ठाणे : साहित्य,कला, आणि निसर्ग ह्यामधील 'निर्मिती' या घटकाला केंद्रस्थानी ठेवून 'अजेय संस्था' 26 जानेवारी 2020 रोजी 'मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, ठाणे येथे सृजनोत्सव हे एकदिवशीय संमेलन भरवत आहे. ह्या संमेलनाची मूळ संकल्पना लेखक,दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी ह्याची आहे आणि निर्माता गौरव संभुस हे आहेत.रविवारी सकाळी ९.३० वाजता अभिनेता निखिल राऊत आणि अभिनेत्री अश्विनी कासार ह्यांच्या हस्ते उद्घाटनाने सुरवात होत आहे. 

          हे संमेलन चार सत्रा मध्ये विभागले आहे. निर्मितीचे मूलभूत घटक स्त्री ,पुरुष आणि निसर्ग यावर 'ती आणि तो' हे पहिले सत्र  आधारित आहे.स्नेहा वाघ ह्या सत्राचे नियोजन पाहत आहे तर अवधूत यरगोळे आणि सायली शिंपी ह्या सत्राचे निवेदक आहेत. उदघाटनानंतर लेखक,दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी ह्यांचे प्रस्तावित होणार आहे.' तो आणि ती' स्त्रीत्व अथवा पुरुषत्व ह्या सूत्रा भोवती केंद्रित काव्यरचना,निसर्ग: निर्मितीचा स्रोत ' निसर्ग विनाश आणि मानव' ' निसर्गातील सृजनशोध' ह्या विषयावर निवडलेल्या कवितांचे कविसंमेलन रंगणार आहे. ह्यात अशोक धोपेश्वरकर,रवींद्र शिणोलीकर,विकास भावे, रवींद्र चवडे,किरण बरडे,मानसी चापेकर,कार्तिक हजारे,संगीत कुलकर्णी, स्मिता मोरे,हर्षद खरडे,गणेश कदम, डॉ.हिमांशू टिल्लू,स्नेहा वाघ,आशा दोंदे,दीपा ठाणेकर,ऐश्वर्या सावंत ह्या कवी व कवियत्री सहभाग असणार आहे. ' सर्जनशील' 'स्त्री- पुरुष संबंध अशा विषयावर अतिथीशी खेळकर प्रश्नोत्तरे आणि गप्पा होत पहिले सत्र पूर्ण होणात आहे.11:30 वाजता निर्मितीमधील भाषा ह्या घटकावर ' अ ते ज्ञ ' हे सत्र सुरू होणार आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉ.विजया वाड ह्या या सत्राला सन्माननीय अतिथी म्हणून लाभल्या आहेत. ' माध्यमातील बदलते मराठी भाषेचे व्याकरण : एक परखड विश्लेषण ' , ' मातृभाषा आणि बदलत्या 'माता' ,' तरुणांची भाषा व्याकरणे समजून घेताना' , ' व्याकरण : एक मुक्त चिंतन ' , ' भाषा व्याकरण : माझा चिकित्सक अभ्यास ' ' मराठी शिक्षणाचे भविषयचित्र'  या विषयावर अजेय संस्थेने निबंध मागवले होते आणि त्यातील काही निवडक निबंधांचे वाचन सादर होणार आहे, त्यात मानसी जोशी,आनंद लेले, मनमोहन रोगे, राजश्री भिसे हे त्यांचे निबंध सादर करणार आहेत तर प्रा.पद्मा हुशिंग ह्या सगळ्यांशी विशेष संवाद साधणार आहेत. अस्मिता चौधरी ह्या या सत्राचे नियोजन पहात आहेत.संगीता धनुकटे, अस्मिता चौधरी ह्या या सत्राच्या निवेदिका आहेत. मराठी भाषा ह्या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन 3 लघुनाटिका सादर होणार आहेत त्यात अनुक्रमे जिज्ञासा संस्था, डॉ.बेडेकर विद्यामंदिरचे विद्यार्थी आणि अजेय चे युवा कलाकार सादर करणार आहेत. ' अ ते ज्ञ ' सत्राच्या सन्माननीय अतिथी डॉ.विजया वाड ह्या प्रेक्षकांशी ' विश्वकोश आणि आपण ' , ' विश्वकोशाचे अंतरंग, विश्वकोशाची नोंद कशी तयार होते इथपासून विश्वकोश कोषातून विश्वात यावा या साठी घेतलेल्या 180 ग्रंथ स्पर्धांच्या विविधांगी अनुभवाबाबत'. या विषयावर संवाद साधणार आहेत. त्या नंतर 1:30 ते 2:30 ही जेवणाची वेळ ठेवण्यात आली आहे.

कलेतल्या , साहित्यातल्या तांत्रिक बाजूंवर आधारित ' सर्जन स्वरूप ' हे सत्र सुरू होणार आहे. अलका दुर्गे ह्या या सत्राचे नियोजन पहाणार आहेत. अश्विनी गोडसे, मनीषा चव्हाण ह्या या सत्राच्या निवेदिका आहेत.या सत्रात उद्याची नवसर्जने या विषयावर डॉ.क्षितिज कुलकर्णी अभिनेता पवन वेलकर ह्यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. ह्यात स्नेहा शेडगे संवादक म्हणून सहभागी होणार आहेत. सुनीता फडके काव्यप्रस्तुतीकरण करणार आहेत तर शास्त्रीय गायिका गौरी घुले त्यांच्या गायनातून यमनरागाचा विशेष रागसर्जन सादर करणार आहेत.याच सत्रात '  दशलक्षेशु ', 'आदित्य' ,'सृष्टी' ,' नावांकुर ' ,'सृजनरंग' , 'ठसा' अशा सहा गटांमध्ये सर्जन खेळांवर स्पर्धा रंगणार आहे.संध्याकाळी4:30 वाजता निर्मिती या प्रक्रियेतील अनुभव या घटकाला केंद्रस्थानी ठेवून ' लव्हाळी ते वटवृक्ष' या सत्राला सुरुवात होणार आहे. गौरव संभूस हे या सत्राचे नियोजन पहात आहेत आणि वर्षा जोशी ह्यांच्या बरोबर निवेदक ही आहेत.या सत्राला दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक भारत सासणे, ज्येष्ठ संशोधक-लेखक-वक्ते श्री.विजयकुमार फातर्पेकर हे अनुक्रमे लेखन प्रक्रिया, यक्षगान संशोधनात भेटलेली विशेष माणसे यावर प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. प्रतिमा कुलकर्णी ह्यांची दिग्दर्शनाकडे पहायची दृष्टी, त्यांचे अनुभव प्रवास, हे सर्व पैलू त्यांच्या मुलाखतीतून रसिक प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.सौरभ सोहोनी हा प्रसिद्ध तरुण निवेदक व मुलाखतकार त्यांची मुलाखत घेणार आहे. प्रतिभा चांदूरकर ह्यांच्या समारोपाच्या भाषणाने ' सृजनोत्सव ' हे एकदिवशीय सृजन संमेलन संपन्न होणार आहे. सायली शिंपी, हेमांगी कुळकर्णी, आदिती जोशी, समीर शिर्के, कार्तिक हजारे, तपस्या काळेल, आकाश भालेराव, पवन वेलकर, सुनील शिरसाट, प्रतिभा चांदूरकर, हे सर्व या संमेलनाच्या नियोजनात साहाय्य करणार आहेत. निर्मितीला वाव देणाऱ्या काही ' आर्ट installations' चं दालन ही रसिक प्रेक्षकांसाठी खुलं असणार आहे. ह्या दालनात मराठी ग्रंथ संग्रहालयात खाल पासून हॉल पर्यंत वैविध्य पूर्ण कल्पक मॉडेल्स मांडली जाणार आहेत. स्वाती भट, आकाश भालेराव, वर्षा गंद्रे, वर्षा जोशी, कार्तिक हजारे, स्मिता ठाकूर, राजश्री भिसे, अस्मिता चौधरी, स्नेहा वाघ ह्या संपूर्ण टीम ने मॉडेल्स व सजावट केली आहे. 

Web Title: Creation Festival One-Day Meeting to be held on January 26 on behalf of invincible organization in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.