शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांची कोंडी फुटली; मोकळ्या जागा, व्यावसायिक गाळे यांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:27 IST

निवासी क्षेत्र, गर्दीची ठिकाणे वगळून मोकळी मैदाने आणि व्यावसायिक गाळे येथे फटाक्यांची दुकाने सुरू करण्यास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी अनुमती दिल्याने सोमवारपासून ठाण्यात फटाक्यांचे स्टॉल्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे : निवासी क्षेत्र, गर्दीची ठिकाणे वगळून मोकळी मैदाने आणि व्यावसायिक गाळे येथे फटाक्यांची दुकाने सुरू करण्यास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी अनुमती दिल्याने सोमवारपासून ठाण्यात फटाक्यांचे स्टॉल्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने सरसकट फटाक्यांच्या स्टॉल्सवर बंदी लागू केल्याने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाची बैठक घेऊन फटाकेविक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली. ही परवानगी देताना गर्दीची ठिकाणे, निवासी क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तर, खुली मैदाने आणि व्यावसायिक गाळ्यांच्या ठिकाणी फटाकेविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयाचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जावी, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.दिल्ली न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले. राज्य शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले होते. त्यामुळे फटाके विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. सरसकट बंदीविरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने घेतली. मात्र, ठाणे शहर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आ) ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती.जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास, ठाणे महापालिकेची मैदाने, मोकळे भूखंडावर लावण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, मागील वर्षी तब्बल २५० च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते.विशेष म्हणजे यासाठी आकारण्यात येणाºया भाड्यातही ठाणे महापालिकेने मागील वर्षी वाढ केली होती. दरम्यान, आता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे अग्निशमन दलाने, नाहरकत परवाना देण्यास मज्जाव केला. त्यामुळे दिवाळीसाठी खरेदी केलेल्या फटाक्यांची विक्री कशी करायची, असा पेच या विक्रेत्यांना सतावू लागला होता. अखेर, हा पेच संपुष्टात आला.

टॅग्स :fire crackerफटाकेdiwaliदिवाळी