शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा, दिवा खाडीतील रेती माफियांवर कारवाई; सहा बार्ज जाळून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By सुरेश लोखंडे | Updated: October 11, 2022 20:04 IST

जिल्ह्यातील खाडी व नद्यांमध्ये रेती माफियांनी मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन अवैधरित्या सुरू केले आहेत. त्याविषयीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई आज हाती घेतली.

ठाणे : जिल्ह्यातील खाडी ठिकठिकाणच्या खाडीतील बेकायदेशीर, अवैधरित्या रेती उत्खनन करणाºया रेती माफियांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई केली. मुंब्रा बंदरासह दिवा, कोपर खाडी, मोठागांव बंदर आदी ठिकाणी मंगळवारी ही धडक कारवाई करण्यात आली.  जिल्हा दक्षता पथक, रेतीगट शाखा, कल्याण तहसीलदार, तलाठी, बारावे, टिटवाळा येथील यंत्रणेने २१ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा बार्ज जाळल्या.  

जिल्ह्यातील खाडी व नद्यांमध्ये रेती माफियांनी मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन अवैधरित्या सुरू केले आहेत. त्याविषयीच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई आज हाती घेतली. अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्या निर्देशानुसार या कारवाईदरम्यान या पथकाने खाजगी बोटीच्या साहाय्याने मोठागाव बंदर येथून कारवाईला सुरुवात करून कोपर आणि दिवा खाडीमध्ये तीन सक्शन पम्प पाण्यामध्ये बुडाविल्याचा दावा केला आहे. तर बार्ज जाळण्यात आले, या कारवाई पथकाची चाहूल लागताच मुंब्रा बंदरातील चार बार्जचे वॉल खोलून कामगारांनी खाडीतून पळ काढला. त्यामुळे चार सक्शन खाडीत बुडाविण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहूल सारंग यांनी दिली.

जिल्हा दक्षता पथक, रेतीगट शाखा आणि कल्याण तहसीलदार यांच्या  तलाठ्यांनी व बारावे, टिटवाळा येथील कारवाई पथकाच्या मनुष्यबळाने ही संयुकत करावाई केली. यामध्ये सक्शनपंपवरील चार कॅबिनही जाळण्यात आल्या आहेत. तर एक सक्शन खोल पाण्यात आणून गॅस कटरने कट करीतत खोल पाण्यात बुडाविल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह एकूण सात सक्शन पंपवरील २१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल आणि साह बार्ज जाळून नष्ट करण्यात महसूल विभागाला यश आलेले आहे.

टॅग्स :thaneठाणे