शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘एका लग्नाची गोष्ट’; ६०० रोपे, ३०० कापडी पिशव्या, ३० हेल्मेटचा केला ‘आहेर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:58 IST

हळदीवरील खर्चाला कात्री

- नितीन पंडितभिवंडी : लग्न म्हटले की, थाटमाट, बडेजाव व अनावश्यक खर्चाची स्पर्धा आली. मात्र, भिवंडी शहरातील श्रीकांत व मानसा यांच्या लग्नात मानसाचा भाऊ विघ्नेश कुसमा याने हळद समारंभ, मंडप सजावट व अन्य अनावश्यक खर्चाला कात्री लावत लग्न सोहळ्यास वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना तब्बल ६०० वृक्षांची रोपे, ३०० कापडी पिशव्या व ३० हेल्मेट वितरित केले. याखेरीज, दोन गरीब विद्यार्थिनींची वर्षभराची शाळेची फी भरून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.भिवंडी शहरातील पद्मानगर येथील कुसमा कुटुंबातील मानसा हिचा विवाह श्रीकांत याच्यासोबत पद्मशाली समाज हॉल या ठिकाणी बुधवारी आयोजित केला होता. यावेळी वधू मानसाचा भाऊ विघ्नेश याने आपल्या बहिणीच्या लग्नसोहळ्यात सामाजिक भान राखले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे असल्याने सोहळ्याला जमलेल्या ६०० जणांना वृक्षांची रोपटी भेट दिली. प्लास्टिकबंदीनंतरही कापडी पिशव्या वापरण्यात येत नसल्याने ३०० कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक हद्दपार करण्याचा संदेश दिला. रस्त्यावर असंख्य अपघात हेल्मेट न घातल्याने कित्येकांचा मृत्यू होतो. तुम्ही हेल्मेट नियमित वापरले तर अपघातात तुमचा जीव वाचू शकतो, हे बिंबविण्यासाठी ३० हेल्मेट वितरित केल्याची माहिती विघ्नेशने दिली.फी चा खर्च उचललाकित्येक मुली गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. हळद समारंभ न करता त्यातून वाचलेले पैसे सत्कारणी लागावे, यासाठी दोन गरीब मुलींच्या शिक्षणाची वर्षभराची फी भरल्याचे त्याने सांगितले. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न