शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रोजेक्ट भिवंडीत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:20 IST

भिवंडी येथे पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्याच्या दृष्टीने पाऊले पडण्यास सुरुवात झाली

ठाणे : भिवंडी येथे पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्याच्या दृष्टीने पाऊले पडण्यास सुरुवात झाली असून, आज वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनच्या सदस्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत याविषयीची विस्तृत माहिती दिली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देखील यावेळी बोलतांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी देणाऱ्या या प्रस्तावित हबसाठी जमीन उपलब्धता, तसेच इतर गोष्टींसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.भिवंडीत निर्यात प्रोत्साहनसंदर्भात एक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यावरही चर्चा झाली. बैठकीत वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे यांनी देखील या हबची माहिती दिली. एमआयडीसी स्पेशल पर्पज व्हेईकल करून त्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाल्यास विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण, महानगरपालिका, महसूल विभाग या व इतर शासकीय संस्थांशी समन्वय साधणे अधिक सोयीस्कर होईल असा विचार असल्याचे सांगून अतुल पाटणे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता असून यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स, असतील. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण प्रक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.  कालबध्द रीतीने कार्यवाही व्हावीभिवंडी येथे सुमारे ७ लाख पॉवरलूम्स असून १० लाखांपेक्षा जास्त कामगार यात थेट रोजगार मिळवितात अप्रत्यक्षरित्या ४० लाख लोकांचा जीवन चरितार्थ या उद्योगावर आहे. देशातील एकूण यंत्रमागांपकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यातही भिवंडीचा सर्वात अधिक वाटत असून पॉवरलूम संस्थांचे बळकटीकरण, कामगारांचे कल्याण मंडळ,यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक अशा माध्यमातून या क्षेत्राच्या समस्या दूर करण्यात येत आहेत. भिवंडी येथे मेगा क्लस्टरच्या उभारणीने या भागाचा चेहरा मोहरा बदलेल मात्र कालबध्द रीतीने याची कार्यवाही व्हावी अशी मागणी बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी केली.भिवंडीतील पायाभूत सुविधा, रस्ते, शौचालये आदी उपलब्ध करणे या बाबींवर देखील लक्ष्य केंद्रित करावे असे  पुरुषोत्तम वंगा, अध्यक्ष भिवंडी पद्मानगर पावरलूम व्हीवर्स यांनी सांगितले. माजी आमदार माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी देखील वीज वितरण कंपनीच्या ( टोरेंट) समस्या मांडल्या.भिवंडी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शहरातील रस्ते, पूल, स्वच्छता याबाबतीत प्राधान्याने कारवाई सुरु असून या  मेगा क्लस्टरच्या दृष्टीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे सांगितले.भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी ५ सप्टेंबर रोजी प्रांत कार्यालयात सोयी सुविधांसंदर्भात सर्व  प्रतिनिधींसमवेत चर्चा करण्यात येईल असे सांगितले. बैठकीपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी माहिती दिली.  प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी चे अधिकारी यासाठी उपस्थित होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडी