प्रशासनाविरुद्ध बोलणाऱ्या नगरसेवकांचे ‘मोजमाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:15 AM2019-08-31T00:15:53+5:302019-08-31T00:15:57+5:30

दबावतंत्राचा वापर : नगरसेवकांमागे शुक्लकाष्ठ

Councilors 'measurements' who talk against administration | प्रशासनाविरुद्ध बोलणाऱ्या नगरसेवकांचे ‘मोजमाप’

प्रशासनाविरुद्ध बोलणाऱ्या नगरसेवकांचे ‘मोजमाप’

Next

ठाणे : महासभेत प्रशासनाविरोधात बोलणाºया नगरसेवकांची कुंडली बाहेर काढली जात असून, काहींना अनधिकृत बांधकामप्रकरणी नोटीसही बजावण्यात आली आहे. काहींच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्या बांधकामाचे मोजमाप घेण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडणाºया नगरसेवकांच्या घरापर्यंत पालिकेचे अधिकारी चौकशीसाठी पोहोचल्याने हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.


बुधवारच्या महासभेत पालिकेचे सर्वच अधिकारी गैरहजर होते. महासभेला हजर राहिल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा मेसेज आयुक्तांनी अधिकाºयांना पाठवल्याचा गौप्यस्फोटही लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाचा निषेध करून, काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचे अशोक वैती आणि भाजपचे अशोक राऊळ यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर, प्रशासनाच्या वतीने काही नगरसेवकांची कुंडली काढण्यात आली. आता टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर पलटवार करण्यास सुरुवात झाली आहे. इतर नगरसेवकांमागेही चौकशीचा ससेमिरा लागू शकतो. भाजपचे मिलिंद पाटणकर पाटणकर यांच्या घराचे मोजमाप पालिकेने घेतले असून, यासंदर्भात ते म्हणाले की, आयुक्तांच्या बंगल्याचा आराखडा मंजूर आहे का, त्याची चौकशी करा. अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार केलेल्या तक्रारंची दखल का घेतली जात नाही? त्यांच्याशी आयुक्तांचे काय संबंध आहेत, ते उघड करण्याचे खुले आव्हानच त्यांनी दिले.

पाटणकरांच्या सदनिकेची पुन्हा मोजणी
प्रशासनाविरोधात सभागृहात मत मांडणारे भाजपचे मिलिंद पाटणकर यांच्या घरी पालिकेच्या अधिकाºयांनी शुक्रवारी धडक दिली. पाटणकर यांनी दोन सदनिका एकत्र केल्या आहेत. त्याचे मोजमाप अधिकाºयांनी घेतले आहे. याप्रकरणी प्रशासनाने यापूर्वीही कारवाईचा बडगा उगारला होता.
विक्र ांत चव्हाण यांनी अविश्वास ठराव मांडल्याने, परमार आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुन्हा एकदा होण्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. सेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाचीही चौकशी शहर विकास विभाग करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Councilors 'measurements' who talk against administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.