शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:17 IST

मनसेचे बेमुदत उपोषण; कामे अर्धवट असतानाही केडीएमसीकडून कंत्राटदारांना बिले अदा

कल्याण : पूर्वेकडील आमराई आणि तिसगाव गावठाण या दोन प्रभागांतील रस्त्यांची कामे अर्धवट असतानाही त्यांची बिले कंत्राटदारांना अदा केल्याच्या निषेधार्थ मनसेने केडीएमसीच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात बुधवारपासून बेमुदत उपोषण छेडले आहे. त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला असून चुकीच्या पद्धतीने बिले अदा करणाऱ्या अधिकाºयांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक १००- तिसगाव गावठाणमधील १०० फुटी रस्त्याच्या कामाला मार्च २००९ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु, अजूनही हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. मात्र, संबंधित कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणावर बिल अदा केल्याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. तर, प्रभाग क्रमांक ९९ आमराईमधील १८ मीटर रस्त्याच्या कामाला मार्च २०१४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. हे कामही अर्धवट असताना बिलाची रक्कम अदा केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. २६ जूनला यासंदर्भात पत्र देऊन या दोन्ही रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर काम पूर्ण होण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला होता.दरम्यान, कोणतीही कार्यवाही न झाल्याने मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड, उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे, विभाग अध्यक्ष विनीत भोई, देवेंद्र पिंगळे, उपविभागीय अध्यक्ष मनीष यादव, योगेश लमखडे, शांताराम गुळवे आदी पदाधिकारी ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात बुधवारपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत.कामे पूर्ण नसताना जी बिले अदा केली आहेत, त्याबाबत कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त करावी, त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे, रस्त्याच्या कामात बाधित होणाºयांचे योग्य त्याठिकाणी पुनर्वसन व्हावे, आदी मागण्याही महिनाभरापूर्वी करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेroad transportरस्ते वाहतूकCorruptionभ्रष्टाचार