शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यातील भ्रष्टाचार : सभागृह नेत्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 00:49 IST

केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अ‍ॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कच-याऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता.

कल्याण : केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अ‍ॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कचºयाऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर रात्रीही त्यांनी कचºयाचा डम्पर पकडला. त्यातील कचºयाचे वजन चुकीचे दाखविले गेल्याचा आरोप समेळ यांनी केल्याने तेथे कंत्राटदाराच्या प्रतिनिधीशी समेळ यांचा वाद झाला. यावेळी कंत्राटदाराचे काही लोक समेळ यांच्या अंगावर धावून आले. मात्र, समेळ यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची तक्रार कंत्राटदाराने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समेळ यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, समेळ यांनी कचºयाचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.कचरा कंत्राटदाराचे कामगार कचºयाऐवजी डेब्रिज गोळा करून त्याचे वजन दाखवून महापालिकेकडून पैसे उकळत असल्याचा आरोप समेळ यांनी महासभेत केला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी आधारवाडी डम्पिंगवर कचºयाऐवजी डेब्रिज घेऊन जाणारा डम्पर पकडला होता. त्यानंतर रात्री तसाच एक डम्पर डम्पिंगवर येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे ते तेथे ९.३० वाजता पोहोचले. तेथे कंत्राटदार कंपनीचा प्रतिनिधी व कामगारांनी समेळ यांच्याशी वाद घातला. तो विकोपाला गेल्याने काही कामगार व कंत्राटदाराचा प्रतिनिधी समेळ यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा समेळ यांच्या समर्थकांनी त्यांना रोखले. दुसरीकडे समेळ यांनीच धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची तक्रार कंत्राटदाराने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.दुसरीकडे या घटनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश पवार यांच्याशी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी चर्चा केली. कंत्राटदाराची इतकी हिम्मत कशी वाढते की तो सदस्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतो. सदस्याने चुकीचा प्रकार उघडकीस आणायचा नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.दरम्यान, मी गैरप्रकार उघड केल्याने कंत्राटदार माझ्याविरोधात बनाव करत आहे. कंत्राटदाराच्या एका कामगाराने डंपरवर डोके आपटून स्वत:ला दुखापत करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगाराला मी मारहाण केल्याचे कंत्राटदाराला भासवायचे होते, याकडे समेळ यांनी लक्ष वेधले.असाच प्रकार यापूर्वीही घडला होताकचºयातील अशाच पद्धतीचा गैरप्रकार केडीएमसीत काही वर्षांपूर्वी मनसेचे माजी नगरसेवक उल्हास भोईर यांनी उघड केला होता. तेव्हाही प्रकरण पोलिसात गेले होते.त्यावेळी नगरसेवकांनी हा विषय महासभेत उचलून धरला होता. त्यामुळे कंत्राटदार अन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचे सांगून तत्कालीन आयुक्तांनी कंपनीचे कंत्राट रद्द केले होते.त्यानंतर या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कचरा गोळा करण्याचे कंत्राट न देता महापालिकेच्या कर्मचारी वर्गाकडून हे काम गेले जात होते.मात्र, आता पुन्हा कंत्राटदाराला हे काम दिल्याने तोच प्रकार होत असल्याचा आरोप समेळ यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा कंपनीचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी महासभेत केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण