शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नगरसेवकांचेच बेकायदा इमले, घरतांशी कुणाचा होता ‘घरोबा’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:08 AM

वाढता राजकीय हस्तक्षेप आणि बांधकाम व्यवसायात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नगरसेवकांची असलेली भागीदारी आणि त्यांची अधिकाऱ्यांबरोबर असलेली अभद्र युती, यात लाचखोरीला प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा आहे.

कल्याण - वाढता राजकीय हस्तक्षेप आणि बांधकाम व्यवसायात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नगरसेवकांची असलेली भागीदारी आणि त्यांची अधिकाऱ्यांबरोबर असलेली अभद्र युती, यात लाचखोरीला प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा आहे. यातच आता घरतांशी कुणाकुणाचा घरोबा होता, या चर्चेला शहरात पेव फुटले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या लाचखोरी प्रकरणामुळे बांधकाम विभागात भ्रष्टाचार कशा प्रकारे बोकळला आहे, याची प्रचीती आली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात लाच मागण्याच्या प्रकरणात याआधीही काही अधिकाºयांना गजाआड व्हावे लागले. त्यात नगरसेवकही मागे नाहीत.घरत यांना बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाखांची लाच घेताना अटक केली. अशा प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे असो अथवा विविध घोटाळे, यामध्ये केडीएमसी पुरती बदनाम झाली आहे. सर्वाधिक भ्रष्टाचार हा अनधिकृत बांधकामांमध्ये सुरू आहे. बिनदिक्कतपणे उभ्या राहत असलेल्या अशा बांधकामांमधून मिळत असलेला बक्कळ पैसा अधिकारी तसेच नगरसेवकांकडून उकळला जात आहे. एकीकडे महासभेत अनधिकृत बांधकामांविरोधात बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे मात्र बांधकामांना अभय देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करायची, हा दुटप्पीपणा यापूर्वी अटक झालेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून दिसून आला आहे. घरत यांच्यासह दोन लिपिकांना झालेली अटक पाहता २० वर्षांत केडीएमसीतील लाचखोरीचा आकडा २८ च्या आसपास पोहोचला आहे. त्यात प्रभागक्षेत्र अधिकाºयांचा प्रामुख्याने समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत बांधकामांत पैसे उकळण्यात सर्वाधिक सापळे लाचखोरीचे लागले आहेत.दरम्यान, महापालिकेत बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेले नगरसेवक आणि भ्रष्ट अधिकारी यांची अभद्र युतीदेखील या परिस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. अशाच नगरसेवकांकडून मिळत असलेल्या अभयामुळे संबंधित अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. बांधकाम तसेच बांधकाम साहित्य पुरवण्याच्या व्यवसायात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या नगरसेवकांचा आढावा घेता असे ७० ते ७५ टक्के नगरसेवक आणि काही नगरसेविकांचे पतीही आहेत. अनधिकृत बांधकाम उभारण्याकडे बहुतांश नगरसेवकांचा कल असल्याने आपसूकच त्यांचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी लागेबंधे असतात, अशीही सूत्रांची माहिती आहे. काही बांधकामांमध्ये तर नगरसेवक आणि अधिकाºयांची भागीदारीदेखील असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, केडीएमसी हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजत आहे. अशा बांधकामांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अग्यार समितीच्या अहवालाचे काय झाले, असाही सवाल उपस्थित होत आहे.दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून महासभा चांगलीच गाजली होती. त्यात अशा बांधकामांना जबाबदार असलेले अतिरिक्त आयुक्त घरत, उपायुक्त सुरेश पवार आणि तत्कालीन ई प्रभागाचे अधिकारी भागाजी भांगरे यांना निलंबित करा, असा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला होता. यावर आजवर ठोस अंमलबजावणी झालेली नाही. विरोधी पक्ष मनसेवगळता अन्य कोणत्याच पक्षाने यासंदर्भात पाठपुरावा केला नाही. त्यात आता घरत यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने अनधिकृत बांधकामांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून ठरावाच्या दृष्टीने उपायुक्त पवार आणि तत्कालीन प्रभाग अधिकारी भांगरे हे दोघेही गोत्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन महिने उलटूनही ठरावावर योग्य ती अंमलबजावणी न करणारे आयुक्त गोविंद बोडके यांनी संबंधित अधिकाºयांना पाठीशी घातल्याचे स्पष्ट झाले आहे.अतिरिक्त आयुक्तपदासाठी राज्यमंत्र्यांनी केली शिफारससंजय घरत यांची केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरकारदरबारी शिफारस केली होती. त्यामुळे ही शिफारस आता लाचखोरीच्या प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तपदाच्या निवडीवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून त्यावरील निर्णय प्रलंबित आहे. कल्याणमधील सुलेख डोण यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यांनी घरत यांची नियुक्ती बेकायदा असल्याकडे लक्ष वेधत त्यांना मूळ उपायुक्तपदावर आणण्याची मागणी २०१६ मध्येच केली होती.लाचखोर शोधतात कायद्यातील ‘अभय’वाटा!आधीच २५ लाचखोर अधिकारी-कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असताना बुधवारी अतिरिक्त आयुक्तांसह अन्य तिघांना लाचखोरीच्या प्रकरणात जेरबंद केल्याने केडीएमसी एक प्रकारे भ्रष्टाचाराची गंगोत्री असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. लाचखोरीसंदर्भातील कायद्यातून हे लाचखोर सोयीचा मार्ग शोधून पुन्हा सेवेत रुजू होतात आणि ‘जाऊ तिथे खाऊ’ ही प्रवृत्ती कायम राहते, असे जाणकारांचे मत आहे.एकीकडे लाचखोरीमुळे केडीएमसीतील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असताना वारंवार बदलणारे सरकारी निर्णय हे लाचखोरांच्या हिताचेच ठरत आहे. यातच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम होत आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासंदर्भात विविध उपाययोजना करायच्या आणि दुसरीकडे नियम शिथिल करून भ्रष्टाचार करणाºयांना अभय देण्याची दुटप्पी भूमिकाही यातून दिसून येते.राज्य सरकारच्या निलंबित सरकारी सेवकांच्या २०११ च्या निर्देशानुसार जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारीपदापासून त्यांना दूर ठेवण्याचे आदेश असताना, याकडे मात्र केडीएमसी प्रशासनाने पुरता कानाडोळा केल्याचेही पाहावयास मिळते. २०११ च्या निर्देशानुसार निलंबित झाल्यापासून दोन वर्षांत पुन्हा संबंधित लाचखोर सेवेत दाखल होऊ शकतो. अशा प्रकरणात पकडले गेल्यानंतर पहिले सहा महिने त्याला अर्धे वेतन द्यावे लागते, नंतर मात्र ७५ टक्के वेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.लाचलुचपत प्रकरणात अटक झालेल्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेत निलंबन आढावा समिती असते. परंतु, या समितीत केवळ महापालिकेचे स्थानिक अधिकारी असतात. त्यामुळे लाचखोरांचा सेवेत येण्याचा मार्ग सुक र होतो. त्यासाठी समितीमध्ये सरकारकडील एखादा अधिकारी असावा, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, महापालिका सेवेत आल्यानंतर संबंधित व्यक्तीला अकार्यकारीपद देऊन त्याची विभागीय चौकशी करणे बंधनकारक आहे. परंतु, केडीएमसीत सुरुवातीपासूनच अशा लाचखोरांना कार्यकारीपदे बहाल केल्याचे पाहावयास मिळते. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारnewsबातम्या