शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे नगरसेवक चालले उटी फिरायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:10 IST

भार्इंदर पालिका : पक्षाच्या वतीने केला जाणार खर्च; यापूर्वी कुर्ग, महाबळेश्वर येथे झाला होता दौरा

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील स्थायी समितीचे नगरसेवक युरोपला फिरायला जाणार असताना भाजपचे नगरसेवकही १ ते ५ जूनदरम्यान उटी येथे पर्यटनासाठी जाणार आहेत. या नगरसेवकांच्या सहलीचा खर्च पक्षाच्या वतीने केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याआधीही भाजप नगरसेवक पक्षाच्या खर्चाने कर्नाटकातील कुर्ग आणि महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते.

मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपचे ६१ नगरसेवक आहेत. त्यातच, शिवसेनेच्या अनिता पाटील, तर काँग्रेसचे नरेश पाटील व काँग्रेस समर्थक अमजद शेख यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनिता व नरेश यांना पक्षाकडून नोटिसा बजावताच त्यांनी पद रद्द होण्याची कार्यवाही टाळण्यासाठी आपण पक्षातच आहोत, अशी सारवासारव केली.

महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या करदात्या नागरिकांच्या पैशांमधून नगरसेवकांनी आतापर्यंत काश्मीर, सिमला, कुलू-मनाली, देहराडून, कुर्ग, उटी, दार्जिलिंग, सिक्कीम, गोवा, म्हैसूर, अंंदमान-निकोबार येथे अभ्यासदौºयाच्या नावाखाली आपली मौजमजा करून घेतली आहे. नागरिकांच्या पैशांमधून फुकटचे पर्यटन होत असल्याने बहुतांश नगरसेवक असे दौरे काढण्यासाठी नेहमीच पुढे असतात. आतापर्यंत काही कोटींचा खर्च या नगरसेवकांच्या मौजमजेसाठी झाला आहे.

एकीकडे विकासकामांना पैसे नाही म्हणून नागरिकांवर नवीन कर लादतानाच दरवाढही सत्ताधाऱ्यांनी केली आहे. पण, पालिकेच्या खर्चातून दौरे मात्र नगरसेवक आणि पालिका प्रशासन बंद करण्यास तयार नाहीत. सर्व नगरसेवकांचा महापालिकेच्या खर्चातून कुर्ग या पर्यटन ठिकाणी काढला जाणारा दौरा टीकेची झोड उठल्यावर रद्द करण्यात आला होता. पण, महिला बालकल्याण, वृक्ष प्राधिकरण समितीचे नगरसेवक मात्र अनुक्रमे दार्जिलिंग व देहराडूनला मौजमजा करून आले. महापालिकेच्या खर्चातून दौरा रद्द झाल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांसाठी कुर्गची सहल आयोजित केली होती. काही महिन्यांपूर्वीच भाजप नगरसेवकांची महाबळेश्वर येथेही सहल झाली.

आता १ जून रोजी भाजप नगरसेवक पर्यटनासाठी उटी येथे जाणार आहेत. पाच दिवसांचा हा दौरा असून यासाठी सुमारे २० ते २५ लाखांचा खर्च होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या ६१ नगरसेवकांपैकी माजी महापौर गीता जैन यांच्यासह काही नगरसेवक जाणार नसले, तरी शिवसेना व काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नगरसेवक मात्र या पर्यटनात भाजप नगरसेवकांसोबत सहभागी होतील, अशी शक्यता आहे.भाजप नगरसेवकांच्या उटी दौºयाचा खर्च आणि नियोजन पक्षाच्या वतीने केले असून जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे हे जबाबदारी सांभाळत आहेत.- हसमुख गेहलोत,गटनेते, भाजपभाजप नगरसेवकांचा उटी येथे जाणाºया दौºयाचा खर्च पक्ष करणार आहे. नगरसेवकांसोबत कुणी कुटुंबीय येत असल्यास त्याचा खर्च त्या नगरसेवकांनी करायचा असल्याचे आधीच सांगितले आहे. महापालिकेच्या पैशांतून दौरे न काढता स्वखर्चाने दौरे सुरू करून भाजपने पालिकेच्या निधीची बचतच केली आहे. एक चांगला पायंडा भाजप स्थानिक नेतृत्वाने घालून दिला आहे. - हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :BJPभाजपा