शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: क्वारंटाईन 66 हजार जणांवर वाॅच कोणाचा? प्रशासनाचे दुर्लक्ष, काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:23 IST

Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे.

- अजित मांडके ठाणे - दिवाळीनंतर कोरोना रुग्णांसोबतच होम क्वारंटाइन केलेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य केंद्रातील नर्स एकदाच घरी जाऊन विचारपूस करीत असून, एकदा औषधे दिल्यानंतर त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.सुरुवातीच्या काळात लक्षणे नसलेल्या रुग्णांवर यंत्रणेचा करडा वाॅच असायचा. रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर किंवा इमारत सील केली जात होती. आता तेवढे गांभीर्य दिसत नाही. रुग्ण पॉझिटिव्ह आला आणि लक्षणे नसली, तर रुग्ण घरच्या घरी औषधे घेत आहेत. पालिकेकडून फारसे लक्ष दिले जात नाही. रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आशा वर्कर घरी येऊन त्यांना औषधोपचार देत आहेत, परंतु रोज देखरेख ठेवली जात नाही. 

होम क्वारंटाईन रूग्णांचे काय?  कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ही ३४ लाख ३६ हजार १३४ एवढी होती. त्यानंतर, आजघडीला ६५ हजार ८४८ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. पूर्वी ज्या पद्धतीने या रुग्णांवर देखरेख ठेवली जात होती, ती आता ठेवली जात नाही. पूर्वीसारखे काळजीपूर्वक आता लक्ष दिले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.   एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर त्याला आधी कोणता त्रास होत आहे का, याची विचारपूस केली जाते. त्याला त्रास नसेल, तर घरीच राहण्याचा सल्ला दिला जात असून, त्यालाच ऑक्सिजन लेव्हल तपासण्यास सांगितले जाते. त्यानंतर, त्याला औषधे दिली जात आहेत, परंतु त्यानंतर केवळ फोनवरून त्रास वाढला आहे का, याची विचारपूस केली जाते.  

होम क्वारंटाइन रुग्णांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही त्या-त्या महापालिकांची असते. त्यानुसार, त्यांच्याकडून मेडिकल स्टाफ यासाठी दिला जात आहे. तसेच त्यांच्याकडूनच अशा रुग्णांवर देखरेख ठेवली जात आहे.- कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे