शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus vaccine updates: झटपट लसीकरणामुळे झाली ठाण्यात लसीची टंचाई; ५१ लसीकरण केंद्रामुळे आता झाली पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 00:22 IST

जिल्ह्याला मिळाल्या पाच लाख ४८ हजार लसी

ठाणे  : ठाणे  जिल्ह्यासाठी तब्बल पाच लाख ४८ हजार लसींच्या कुपी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात मागणीनुसार टप्प्याटप्प्याने लसींचे वाटप केले जात असताना, ठाण्यात झटपट लसीकरण करण्याकरिता अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण केंद्रे सुरू केल्याने आता लसींचा तुटवडा भासू लागला असल्याचे उघड झाले आहे. 

जानेवारीमध्ये लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात डॉक्टर्स, कर्मचारी यांना लस दिली. विविध संस्थांनी केलेल्या मागणीनुसार लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात येत होते. पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्याला ७४ हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ६४ हजार ५०० लसींचे डोस प्राप्त झाले. आतापर्यंत तब्बल पाच लाख ४८ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. जिल्ह्याला लसींचा अपुरा साठा मिळाला नाही. परंतु ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे जास्तीत जास्त  लसीकरण व्हावे यासाठी, पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ठाण्यात १०० जणांचे लसीकरण होत होते. ती संख्या ३०० पर्यंत वाढवण्यात आली. लसीकरण केंद्रांची प्रारंभी असलेली संख्या नऊ होती. अल्पावधीत ती संख्या ५१ करण्यात आली.  

या केंद्रांच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे १० हजार जणांचे लसीकरण करण्यात येत होते. लसीकरणाची संख्या ठाण्यात भरमसाठ वाढल्याने आता लसींचा नवा साठा लागलीच उपलब्ध होत नाही आणि मागे प्राप्त लस उपलब्ध नाही, अशा कात्रीत ठाणे शहर सापडले आहे. सध्या ११ खासगी आणि २६ सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. महानगरपालिकेला आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५०० कोव्हीशिल्डचा साठा प्राप्त झाला होता. त्यापैकी ९४ हजार ४२ लसींचा वापर झाला असून ६३ हजार ६७० शिल्लक आहेत. ज्यांना कोव्हीशिल्डची लस अगोदर दिलेली आहे, त्यांना तीच दिली जाणार असल्याची माहिती डॉ. राजू मुरुडकर यांनी दिली. सध्या कोव्हक्सिन लसीचा तुटवडा झाल्याने कोव्हीशिल्ड घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी राखून ठेवलेली लस पहिला डोस घेण्यास येणाऱ्यांना दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचे ३९ हजार २२० डोस उपलब्ध झाले होते. त्यातील १८ हजार ३९५ डोस देण्यात आले असून आतापर्यंत १ लाख १२ हजार ४३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका