शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी ‘तो’ ५ कोटींचा निधी वापरा; आमदार रवींद्र चव्हाणांचे आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 16:45 IST

आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कलम ६७ क अन्वये तो कोट्यवधींचा निधी वापरून शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करावे, असे पत्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिले आहे.

डोंबिवली: केंद्र सरकारच्या नॅशनल अर्बन हेल्थ मिशन या योजनेंतर्गत ५कोटी रुपयांचा निधी २०१६ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत जमा झाले. त्यानूसार महापालिकेने चांगले हॉस्पिटल बांधायचे ठरवले, पण काही लोकांनी त्यात मोडता घालून पीपीपी तत्वावर सूतिकागृह बांधायचे ठरवल्याची टीका आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. त्यात आता महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत असून महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कलम ६७ क अन्वये तो कोट्यवधींचा निधी वापरून शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करावे, असे पत्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिले आहे.आरोग्य विषयक आणीबाणी असल्याने तो निधी त्या हॉस्पिटलासाठी वापरावा असे त्यांचे म्हणणे आहे. सुतिकागृहासाठी  ४ वर्षांनी का होईना फेब्रुवारी महिन्याअखेरीस नुकताच एक प्रस्ताव आला असून त्यासाठीच्या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. परंतू त्यास २० दिवस होत नाही तोच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे आता त्यासाठी निधीची गरज नसून तो निधी शास्त्रीनगर रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी वापरावा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.गेल्या चार वर्षापासून निधी आला असेल तर तो पडून का राहिला? त्याला खोडा कोणी घातला? आणि २ जिल्ह्यांचे तत्कालीन पालकमंत्री, राज्यमंत्री आणि महापालिकेच्या सत्तेचे भागिदार असलेल्या आमदार रवींद्र चव्हाण, आणि भाजपचे ते अपयश नाही का? त्यांनी निधी येऊनही सुतिकागृह म्हणा अथवा अद्ययावत हॉस्पिटलची सुविधा का देऊ केली नाही? असा सवाल मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केला. आमदार चव्हाण यांच्या पत्रावर टिका करतांना ते म्हणाल की, बैल गेला आणि झोपा केला अशीच काहीशी अवस्था या पत्रामुळे झाली आहे. ५ कोटी चार वर्षांपासून आले असतील तर त्याचे व्याजही धरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सूतिकागृहाची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून त्या जागी मॉल होणार होता तो प्रयत्न मनसेने २०१० मध्ये हाणून पाडला. जेथे आता अत्रे वाचनालय आहे तेथेदेखील गाळे काढण्याचा मनसुबा होता तो देखील हाणून पाडला. हे सगळ नियोजन खोडा घालणा-या मंडळींचेच होते. प्रत्येक प्रकल्पात फायदा करून घ्यायच्याच मागे ते असतात असा टोलाही त्यांनी लगावला. सोशल मीडियावर त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस