शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus भाईंदरमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 22:14 IST

दिवसभरात 11 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 125 इतकी आहे. अजून 51 जणांचा चाचणी अहवाल यायचा आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - भाईंदर मध्ये दिवसभरात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले असून एकूण कोरोना मुळे मरण पावलेल्यांची संख्या 7 झाली आहे . शहरात नव्याने 6 कोरोना रुग्ण सापडले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 196  झाली आहे. 

भाईंदरच्या जेसलपार्क भागात राहणारे 70 वर्षीय वृद्ध इसमाचा आज पहाटे कोरोना मुळे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मृत्यू झाला . ते जेसलपार्कचे राहणारे असले तरी धारावी येथील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी अडकले होते. तेथून ते भाईंदरला आले असता त्यांना जोशी रुग्णालयात दाखल केले होते . भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट भागात राहणारे 54 वर्षांच्या इसमाचा देखील जोशी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ते बेस्ट मध्ये काम करणारे होते . 

पालिकेने बुधवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार दिवसभरात  कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत . त्यात भाईंदर पूर्वेच्या आनंद नगर भागातील भाजी विक्रेता आहे. भाईंदरच्या लोधा वसाहत, जेपी ठाकूर मार्ग, शिवसेना गल्ली तर मीरारोडच्या गीता नगर फेस 2, करुणा रुग्णालय समोर हे नवीन रुग्ण सापडले आहेत. यात मुंबईतील रुग्णालयाची परिचारिका, वोर्डबॉय व देखभाल दुरुस्ती विभागातील कर्मचारी आहे. 

दिवसभरात 11 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 125 इतकी आहे. अजून 51 जणांचा चाचणी अहवाल यायचा आहे .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस