शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
4
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
5
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
6
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
7
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
8
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
9
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
10
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
11
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
12
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
13
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
14
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
15
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
16
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
17
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
18
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
19
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
20
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

Coronavirus : पोलीस बंदोबस्तात घेतला विलगीकरण कक्षाचा ताबा, २४० खाटांची होणार सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 02:34 IST

१२ मजल्यांच्या या इमारतीमध्ये २४० खाटांची सुविधा असून सध्या ४० खाटांची सोय केली आहे.

ठाणे  - कासारवडवली येथील बीएसयूूपीच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यास नागरिकांच्या असलेल्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात तो सुरू केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. १२ मजल्यांच्या या इमारतीमध्ये २४० खाटांची सुविधा असून सध्या ४० खाटांची सोय केली आहे. यात तळमजल्यावर वैद्यकीय कंट्रोल रूमदेखील तयार केली असून या ठिकाणी २४ तास डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. यापूर्वी श्रीनगर परिसरात अशा प्रकारचा कक्ष सुरू करण्यास विरोध झाला होता.सुरु वातीला ठाण्यातील श्रीनगर येथे सुविधा भूखंडाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पाच मजली इमारतीमध्ये २५ खाटांच्या विलगीकरण कक्षाला विरोध झाला होता. त्यानंतर, कासारवडवली येथील बीएसयूपीच्या इमारतीमध्ये तो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या इमारतीमध्ये कक्ष तयार करण्यासाठी खाटा आणि इतर सामान सोमवारी सकाळी आणायला सुरुवात केल्यावर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांनी खाटा बाहेरदेखील काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा कक्ष या ठिकाणी सुरू करणार नसल्याचे लेखी आश्वासन मिळावे, यासाठी हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सह्यांचे निवेदन ठाणे महापालिकेला दिले होते. मात्र, मंगळवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात तो चालू करण्याचे काम सुरू केले.१२ माळ्यांची इमारतया ठिकाणी १२ मजल्यांची इमारत असून २४० फ्लॅट या ठिकाणी असल्याने गर्दी वाढल्यास २४० खाटांची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करता येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या या ठिकणी ४० खाटांची सोय केली आहे. या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट उपलब्ध असल्याने एका फ्लॅटमध्ये दोघांना स्वतंत्र ठेवण्याची सुविधा आहे. आता पालिकेने याठिकाणी प्रयत्न सुरू केले असले, तरी नागरिक त्याला साथ देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे