शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

Coronavirus : ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील र्निबधात ठाणे जिल्ह्यातील गावपाड्यांबरोबर आता शहारांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 18:00 IST

Coronavirus Break The Chain : तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.

ठळक मुद्दे तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले.मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार.

ठाणे : संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवे आदेश जारी केले आहे. या आदेशास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांप्रामाणेच शहरांमध्येही आता कोरोनाच्या ब्रेक द चेनच्या तिसऱ्या स्तरातील निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील गावपाडे आधीच या तिसऱ्या स्तराचे निर्बंध पाळत आहे. मात्र सोमवारपासून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रलाही तिसऱ्या स्तरांच्या निर्बंधांचे पालन सोमवारपासून कटाकक्षाने करावे लागणार आहे. या तिसऱ्या स्तरातील समावेशाचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी उशिरा जारी केले आहेत.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले आहेत. त्यात जिल्ह्यातील ठाणे मनपासह केडीएमसी नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा कोरोना प्रतिबंधात्मक नियमातील तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे राज्य शासनाने सर्व राज्यभर स्तर ३ चे निर्बंध लागू केले आहेत. हा आदेश २८ जूनपासून पुढील आदेशार्पयत अंमलात राहणार आहे. यामुळे आता गांवखेड्यांप्रमाणोच शहरांमध्येही सर्व व्यवहार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली आहेत.

मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदचयाशिवाय या तिसऱ्या स्तराचे निर्बंध मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील. उपहारगृहे पूर्वीप्रमाणो मात्र क्षमतेच्या ५० टक्के सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सकाळी बाहेर फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. सरकारी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार ५० टक्के क्षमता वापरता येईल. त्यामुळे आता ठाणे शहरातही जिल्ह्यातील गावपाड्यांप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत. तर मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर आदी महापालिका, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदा, शहापूर, मुरबाड नगरपंचायती आणि पाच तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राचे निर्बंध जैसे थे असे राहतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे