शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : अत्यावश्यक कामाशिवाय ठाणे जि. प. त नागरिकांना प्रवेश बंद, कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:29 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनाची २० एप्रिलपासून या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत.

ठाणे - येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक  खबरदारी कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित ठेवणे सक्तीचे केले. तर सर्व  गट अ व ब  गटाच्या अधिका-याची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य असण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी जारी केले. याशिवाय अत्यावश्यक काम नसेल तर कोणत्याही नागरिकास कार्यालयात प्रवेश देण्यास बंदी घातली आहे.    अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनाची २० एप्रिलपासून या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत. यासाठी विविध विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनां नुसार हे आदेश जारी केल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय.जाधव यांनी सांगितले.       सर्व कार्यालयात कर्मचाऱ्यांची केवळ 10 टक्के उपस्थितीच असणार आहे.  कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेमधील प्रत्येकी 6 फुटांचे अंतर आवश्यक आहे. मोठ्या स्वरुपात कोणत्याही सभा घेता येणार नाही. अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या अभ्यंगत यांना मास्क वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. कार्यालय व परिसरात कोणलाही थुंकता येणार नाही. प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर हॅन्ड सॅनिटाईज उपलब्ध ठेवण्या ची सक्ती करण्यात आली आहे.           सर्व अधिकारी, कर्मचारी, यांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर महिला कर्मचाऱ्यांचे 5 वर्षा आतील लहान बाळ असल्यास, त्यांनी  घरुन काम करण्याची लेखी विनंती केल्यास तशी मुभा संबंधित विभाग प्रमुख यांनी द्यावी , असे आदेश सोनवणे यांनी दिले आहेत. तर निर्जंतुकीकरण व साफसफाई करण्याची जबाबदारी बांधकाम विभागावर तर थर्मलस्क्रीनिगची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आहे. अधिकारी , कर्मचारी आदींंना थर्मल स्क्रीनिग व सॅनिटाईज करूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.   वाहने प्रवेशव्दारावर निर्जंतुकीकरण करणेत येणार आहेत. कार्यालयातील अंतर्गत भाग दररोज निर्जतुकीकरण, व-हांडा, जिना दररोज साफसफाई करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे