शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येत समाधानकारक घट; ३२४२ रूग्णांसह ६५ जणांच्या मृत्यूने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:03 IST

उल्हासनगरला ९१ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता या शहरात १८ हजार ४६१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१९ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत मंगळवारही समाधानकारक घट झाली आहे. तब्बल दोन हजार रुग्णांची घट होऊन आज तीन हजार २४२ रुग्ण जिल्ह्यात सापडले. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता चार लाख ५६ हजार ९३१ झाली आहे. तर ६५ जणांच्या मृत्यूने वाढलेली मृतांची संख्या आजपर्यंत सात हजार ४०१ नोंदली आहे. 

ठाणे शहरात ७७० रुग्ण सापडले आहेत. या शहरात एक लाख १६ हजार ३९९ रुग्ण नोंद झाले आहेत. आज ११ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ६३२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७४९ रुग्ण आढळून आले असून आठ जणांचा मृत्यू झाला. या शहरात आता एक लाख १७ हजार ९७९ बाधीत असून एक हजार ४०२ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरला ९१ रुग्ण आढळले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता या शहरात १८ हजार ४६१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ४१९ झाली आहे. भिवंडीला ३२ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे नऊ हजार ७५१ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला ४५७ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू झाले आहे. या शहरात आता ४२ हजार २५० बाधितांसह एक हजार एक मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात ११६ रुग्ण सापडले असून पाच मृत्यू झाले आहेत. या शहरात आता १७ हजार ३४९ बाधितांसह मृतांची संख्या ३६६ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ११९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १८ हजार ५४ झाले असून नऊ मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १७८ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये २४९ रुग्णांचा शोध घेण्यात असून नऊ मृत्यू आज झाले आहे. या गांवपाड्यांत २५ हजार ८४१ बाधीत झाले असून ६७५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या