शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Thane : जिल्ह्यातील आज दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू, संख्या पोहोचली 1809 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 22:05 IST

CoronaVirus in Thane :गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ठाणे: जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही नव्या रुग्णांनी शंभरीचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी आढळून आलेल्या 154 रुग्ण संख्येमुळे जिल्ह्याची रुग्ण संख्याही एक हजार 809 इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील ठाणे महापालिकेने 600 तर नवीमुंबईने 500च्या आकड्याची सीमारेषा पार केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 51 रुग्ण हे ठामपा कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही नवीन रुग्ण मिळून आला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी 154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ठाणे महापालिका हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी सापडलेल्या 51 रुग्णांपैकी15 रुग्ण हे लोकमान्य नगर सावरकरनगर प्रभाग समितीमधील आहेत. त्या पाठोपाठ वागळे इस्टेट -14 आणि दिवा येथील 12 रुग्णांचा समावेश आहे.तसेच त्या नव्या रुग्णांमध्ये 30 महिला रुग्ण असून 21 पुरुष रुग्ण आहेत.

या सापडलेल्या 51 रुग्णांनी ठामपामधील एकूण रुग्ण संख्या 611 इतकी झाली आहे.तर,कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत 27 रुग्ण सापडले असून त्यामधील 20 रुग्ण हे मुंबई,ठाणे आणि वाशी येथे कामाला जाणारे आहेत. त्या 27 जणांमध्ये 17 पुरुष रुग्ण असून 10 महिला रुग्णांचा समावेश आहे.तसेच नवीमुंबईत नवे 43 रुग्ण मिळून आल्याने तेथील रुग्ण संख्याही आता 527 वर पोहोचली आहे. त्यातच नवीमुंबईत दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात दगावणाऱ्यांची संख्या 46 झाली आहे. तर नवीमुंबईतील मृतांची संख्या 10 वर गेली आहे.

भिवंडीत  एका नव्या रुग्ण सापडल्याने येथील संख्या ही 21 झाली आहे. बदलापूरात 4 रुग्ण मिळून आल्याने येथील एकूण रुग्ण संख्या 46 झाली आहे. मिराभाईंदरमध्ये 21 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 223 झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही 7 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 72 वर पोहोचली आहे. तसेच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही नवा रुग्ण मिळून न आल्याने येथील रुग्ण संख्या स्थिर राहिली आहे. ती अनुक्रमे 12 आणि 17 इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे