शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Thane: ठाणे महापालिकेने तयार केला कंटेनमेंट प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 06:21 IST

कोरोनाग्रस्तांचा घेतला जातोय आढावा : रोजच्या रोज आराखड्यात होतोय बदल

ठाणे : ठाणेमहापालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी कंटेनमेन्ट प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीमधून रोज किती जणांना कोरोनाची लागण झाली, किती बरे झाले, किती जणांचा मृत्यू झाला, १४ दिवसांचा कालावधी किती जणांनी पूर्ण केला याची सर्व खबरदारी महापालिका घेत आहे. यात रुग्णांची संख्या कमी झाली तर त्या प्रभाग समितीमधील काही भाग हे अ‍ॅक्टिव्ह झोन म्हणून कार्यरत केले जात आहेत.

प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कोणत्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. कोणत्या भागात रुग्णांची संख्या कमी आहे, त्यानुसार रोजच्या रोज या प्लॅनमध्ये बदल केले जात आहेत. ठाणे शहरात आजघडीला ४४९ च्या आसपास कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. त्यातील १८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये लोकमान्य- सावरकर नगर आणि मुंब्य्रात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही ९४ असून ३३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नऊ नवे रुग्णकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बुधवारी कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईत कार्यरत असलेल्या चार पोलिसांचा समावेश असून, महापालिका हद्दीत सापडलेल्या रुग्णांची संख्या २३३ वर गेली आहे. कल्याण पश्चिमेतील ४३ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुष, तर कल्याण पूर्वेतील ३४ वर्षीय पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. हे तिघेही मुंबईत पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबईत वाहतूक शाखेत काम करणाºया ३७ वर्षीय पोलिसालाही लागण झाली आहे.कल्याण पूर्वेत राहतात. कल्याण पूर्वेतील २८ वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. ती मुंबईतील सरकारी सेवेत सुरक्षारक्षकाचे काम करते. ठाण्यात एका खाजगी कंपनीतील ३२ वर्षीय तरुणाला व महापे येथे काम करणाºया ३३ वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील ४४ वर्षीय महिला आणि ३० वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील ७६ जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस