शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी आता तज्ज्ञ डॅाक्टरांचा टास्क फोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 20:00 IST

कोरोना रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची तयार करण्यात  आला आहे.

ठाणे -  कोव्हीड १९ चा वाढता प्रादूर्भाव रोखण्याबरोबरच या साथ रोगामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आणि रूग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची तयार करण्यात  आला आहे.

 ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड १९ या साथ रोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सिव्हील हॅास्पीटल, होरायझन हॅास्पीटल, सफायर हॅास्पीटल, ज्यूपिटर हॅास्पीटल या ठिकाणी कोव्हीड १९ चे बाधीत रूग्ण दाखल होत आहेत. कोव्हीड १९ या जीवघेण्या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि रूग्णांचा मृत्यूदर टाळण्याच्या हेतूने आणि रूग्णालयांमध्ये भरती झालेल्या रूग्णांना तज्ज्ञ डॅाक्टरांचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा यासाठी महापालिकेच्यावतीने ठाणे शहरातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला असून तसे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज निर्गमित केले.         या टास्क फोर्समध्ये राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॅा. योगेश शर्मा, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॅा. आनंद भावे, किडनी विकार तज्ज्ञ डॅा. ज्योत्स्ना झोपे, डॅा. राजेंद्र गुंजोटीकर, डॅा. विद्या कदम, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॅा. जयनारायण सेनापती, बालरोग तज्ज्ञ डॅा. जयेश पानोट, डॅा. सुहास कुलकर्णी, डॅा. संतोष कदम, भूलतज्ज्ञ डॅा. विजय पाटील, न्यूरो फिजिशयन डॅा. दिपक अहिवाले, ह्रदयरोगतज्ज्ञ डॅा. दयानंद कुंबला, चेस्ट स्पेशालिस्ट डॅा. अल्पा दलाल, वैद्यकिय तज्ज्ञ डाॅ. ऋषिकेश वैद्य, साथ रोग तज्ज्ञ डॅा. प्रिती पिलाय, इंटेसिव्हिस्ट डॅा. रवि घावत आजी तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश आहे.दरम्यान, महापालिकेच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये भरती झालेल्या कोव्हीड १९ बाधीत रूग्णांची प्रकृती अस्थिर आणि किंवा गंभीर आहे वाटल्यास संबंधित रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. अनिरूद्ध माळगावकर ( ९७६९००७०७०) तसेच कोव्हीड १९ चे विशेष कार्य अधिकारी डॅा. राम केंद्रे ( ९७६९६७६९६०) या व्हॅाटस ॲप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेdoctorडॉक्टर