शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: संशयित, इतर रुग्णांवर एकत्र उपचार; मध्यवर्ती रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:49 IST

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय काही दिवसांपासून चर्चेत आले असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह २१ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, ग्रामीण परिसर, अंबरनाथ व बदलापूर आदी ठिकाणांहून दररोज शेकडो रुग्ण मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी येतात. कोरोना संशयित आणि इतर रुग्णांवर जनरल वॉर्डातच उपचार होत असल्यामुळे हे रुग्णालय हॉटस्पॉट ठरत असल्याची टीका होत आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय काही दिवसांपासून चर्चेत आले असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह २१ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण भागातून विविध आजारांनी ग्रस्त असलेले शेकडो रुग्ण दररोज उपचारांसाठी येतात. यामध्ये कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णांचा समावेशही असतो. मात्र, या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत त्यांच्यावर इतर रुग्णांसोबतच उपचार करावे लागत आहेत. आतापर्यंत अशा अनेक रुग्णांचा अहवाल पोझिटिव्ह आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाफर तडवी यांनी दिली. या प्रकारामुळे संसर्ग वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. हे टाळण्यासाठी आणि सर्वच रुग्णांना उपचार मिळण्यासाठी वेगळे रुग्णालय आणि विशेष वॉर्डाची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.शहरातील हृदयरोग, दमा, सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शन आदी रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन डॉक्टरांसह शासकीय व खाजगी रुग्णालयाचा बदलला आहे.

कोरोनाच्या भीतीने व स्वाब अहवाल येईपर्यंत त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. त्यामुळे इतर रोगांवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी केला. राज्य शासन व महापालिका प्रशासन यातून धडा घेणार की नाही? असा सवाल त्यांनी केला. कोरोना संशयित रुग्णांवर स्वाब येण्याची वाट न पाहता कोणत्याही रुग्णालयात तातडीने उपचार व्हावेत. तसेच सर्वच रुग्णांना उपचार मिळण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य शासनासह महापालिका प्रशासनाला दिला आहे.शहर लॉकडाऊन करण्याची मागणीशहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात काही दिवस कडक लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेसह ओमी टीम व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल