शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: शास्त्रीनगर रुग्णालय हाेणार ९ नोव्हेंबरपासून ‘नॉनकोविड’, आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:09 IST

KDMC News : शास्त्रीनगर रुग्णालय कोविडसाठी राखीव असल्याने तेथे अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सहा किलोमीटरचे अंतर कापून कल्याणला रक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर मनपाकडे अपुरी आरोग्य सुविधा होती. त्यामुळे प्रशासनाने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय डेडिकेडेट कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. त्यामुळे अन्य आजार तसेच ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांवर तेथे उपचार होत नव्हते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शास्त्रीनगर रुग्णालय ९ नोव्हेंबरपासून नॉनकोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित होईल, असा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढला आहे.कोरोनाच्या सुरुवातीला मनपाची आरोग्य यंत्रणा तोकडी होती. एप्रिलमध्ये मनपाने शास्त्रीनगर रुग्णालय हे कोविड रुग्णालय असल्याचे घोषित केले होते. तेथे ५२ बेड हे कोरोना रुग्णांसाठी आहेत. त्यामुळे तेथे अन्य आजारांवर उपचार व ओपीडी होती नव्हती. त्यामुळे डोंबिवलीतील अन्य आजारांच्या रुग्णांना कल्याणला रुक्मिणीबाई रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी जावे लागत होते. कोरोनाची लागण अन्य आजारांच्या रुग्णांना होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने तीन खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिग्रहित केली होती. त्यापाठोपाठ २५ खाजगी रुग्णालयांना कोविडवरील उपचाराची परवानगी दिली. दरम्यान, सध्या ३३ रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार होत आहेत.शास्त्रीनगर रुग्णालय कोविडसाठी राखीव असल्याने तेथे अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सहा किलोमीटरचे अंतर कापून कल्याणला रक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. मात्र, अनेकदा रुग्णांना वाहतूककोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे ‘शास्त्रीनगर’ला पुन्हा नॉनकोविड रुग्णालय घोषित करून तेथे पूर्वीप्रमाणेच सर्व आजारांवरील उपचार व ओपीडी सुरू करावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत १६ सप्टेंबरला झालेल्या कोरोना परिषदेत केली होती. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण