शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाण्यात कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंधांची वेसण, नियम मोडाल तर आस्थापना होतील सिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:06 IST

coronavirus in Thane : नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.

ठाणे  - राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स व इतर आस्थापना या रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत. तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सिल केल्या जातील आणि जोपर्यंत कोरोना थांबत नाही.  तोपर्यंयत त्या आस्थापना सिलच राहतील असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले. (Restrictions in Thane again for Stop coronavirus )बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी जे नियम आखण्यात आले होते, तेच नियम आताही लागू असतील असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल, बार, मल्टीप्लेक्स, दुकाने, बाजारपेठामधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने काढलेल्या आदेशाची माहिती या आस्थापनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली असून त्यांनी देखील नियमांचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदींठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रवेशाच्या वेळी प्रत्येकाचे तापमान तपासून प्रवेश, लक्षणो असणा:यांना प्रवेश नाही, हॅन्ट सॅनिटाझर प्रत्येक ठिकाणी प्रवेशद्वारावर असावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टेसिंग, शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृह, रेस्टॉरेन्टमध्ये प्रवेश देतांना घालून दिलेल्या र्निबधाचे उल्लघन होणार नाही याची योग्य ती खबरदारी मॉल व्यवस्थापनाकडून घेण्यात यावी.कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास त्या ठिकाणच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु आता त्याठिकाणी 5क् माणसांनाच परवानगी असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी देखील २० माणसांचीच परवानगी असणार आहे.गृह विलगीकरणासाठी निर्बंधासह परवानगीस्थानिक प्रशासनास व वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखाली गृह विलगीकरण कवण्यात येईल. १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराना पॉझीटीव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरन्टाइनचा शिक्का मारला जाणार, तसेच त्याच्या घरातील इतर नागरीकांना घराबाहरे जाणो टाळावे व मास्कचा वापर करावा या आदेशाचे उल्लघंन केल्यास गृह विलीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीला तत्काळ कोवीड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल.

आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनात ५० टक्के उपस्थिती आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी किंवा शासकीय कार्यालयांमध्ये देखील पूर्वीप्रमाणे 5० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल याची जबाबदारी संबधींत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देखील ऑनलाईन बुकींग करुन दर्शन घ्यावे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्च २०२१ र्पयत बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु या आदेशाचे उल्लघंन झाल्यास संबधींत आस्थापना सील केल्या जातील. परंतु जो र्पयत कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोर्पयत त्या आस्थापना सुरू करता येणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घेऊनच त्या आस्थापना सुरु करता येतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे