शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: उल्हासनगरात घरोघरी जेवण देण्यावर निर्बंध, महापालिका आयुक्तांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 17:00 IST

उल्हासनगरात सरासपणे सामाजिक स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी व इतर संघटनेमार्फत घरोघरी, इमारतींमधून किंवा सोसायटीमधून चपाती बनवून एकत्र केल्या जातात.

उल्हासनगर : घरोघरी जावून जेवणाचे पॉकेट व चपाती प्रत्यक्ष नागरिकांना दिल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त करून त्याला निर्बंध घातले आहे. असा प्रकार झाल्यास कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिल्याने सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात सरासपणे सामाजिक स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी व इतर संघटनेमार्फत घरोघरी, इमारतींमधून किंवा सोसायटीमधून चपाती बनवून एकत्र केल्या जातात.एकत्र केलेल्या चपात्या गोरगरीब व गरजू नागरिकांना वाटल्या जातात. तर काही ठिकाणी काही व्यक्तीं व लोकप्रतिनिधी जेवणाचे पॅकेट बनवून त्याचे वाटप गरजू, गरीब व झोपडपट्टीतील नागरिकांना केले जाते. मात्र हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव एखाद्या ठिकाणी असल्यास त्याचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. कोरोना रोग प्रसारणाची पद्धत आणि त्यावर आवर घालण्याची रीत सर्वच प्रसारमाध्यमांवर रोज आपण पहात आहोत. पोटतिडकीने शासन व महापालिका  आपणास वारंवार याबाबत माहिती देत आहे. मात्र हे सर्व समजून घेण्यासाठी आपण का कमी पडतो हेच लक्षात येत नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांचे म्हणणे आहे.शहरातील नागरिकांना असे जेवण देताना अनेक नागरिकांचा हात लावलेली असतो. त्यातील एक जरी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेलतर, या आजाराच्या प्रसारास मदत करणारी ठरू शकते. आपली मदत आपल्या स्वतःच्या जीवाला, कुटुंबाला अथवा इतरांना अपायकारक ठरणार नाही. ही खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घरोघरी रोटी, चपाती किंवा वाटपासाठी जेवण जमा करणे यावर तात्काळ निर्बंध लादण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. अशा प्रकारची कृती कोणीही करू नये. काही संस्था व संघटना घरोघरी जंतुनाशके फवारण्याची कामे करण्याचाही बाबी समोर आल्या आहेत त्यांच्यावर निर्बंध घालण्यात येत असून कुणीही या निर्देशांचे उल्लंघन केल्यास आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस