शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

CoronaVirus News: रुग्ण बाधित होण्याच्या दरात घट; अंबरनाथमधील दिलासादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:52 IST

पालिका प्रशासनाने राबविल्या विविध उपाययोजना

अंबरनाथ : शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी, याकरिता पालिका प्रशासनामार्फत विविध पातळ्यांवर योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात ५१.२९ टक्के असलेला रुग्ण बाधित होण्याचा दर हा कमी होऊन आॅक्टोबरमध्ये २६.४६ टक्क्यांवर आला आहे.शहरात एकूण २५ हजार ११७ चाचण्या करण्यात आल्या असून बाधित रुग्णांची संख्या आजवर सहा हजार ६४७ एवढी झाली आहे. त्यातील सहा हजार १९ रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात सर्व नागरिकांचे झालेले प्राथमिक आरोग्य सर्वेक्षण, त्यामुळे बाधितांची वेळीच झालेली ओळख आणि त्यांना योग्य वेळी मिळालेले उपचार यामुळे शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दर हा निम्म्यावर आला आहे. यामुळे शहराच्या दृष्टीने ही एक सकारात्मक बाब आहे. सद्य:स्थितीत शहरात एकूण रुग्णसंख्येपैकी ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे आजवर आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ ५.८३ टक्केच रुग्ण आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा ९०.५५ टक्के इतका आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील रुग्णालयात लवकरच ५०० आॅक्सिजन बेडची सुविधाही करण्यात येत आहे, जेणेकरून सध्या उपचार घेत असलेले आणि भविष्यात रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना आॅक्सिजनअभावी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्याचबरोबर सध्या या रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची असून तीही वाढवून ७०० खाटांपर्यंत वाढवण्यात येत आहे.रुग्णांना मिळाले वेळेत उपचारकोरोना नियंत्रणात यावा, याकरिता पालिका प्रशासनाकडून वाढविलेले चाचण्यांचे प्रमाण, अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर दिलेला भर, बाधित रुग्णांना वेळीच मिळालेले उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर शहराचा रुग्ण बाधित होण्याचा दरदेखील कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.भिवंडीत एक लाख ६४ हजार कुटुंबांचे सर्वेक्षणभिवंडी : कोरोनावर उपाययोजना म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सरकारी स्स्तरावर राबविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. भिवंडी महापालिकेने ही मोहीम शहरभर राबविली असून आतापर्यंत एक लाख ६४ हजार ४१३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.पालिकेचे ३५० कर्मचारी व अधिकारी या सर्वेक्षणात कार्यरत आहेत. भिवंडी पालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव सध्या आटोक्यात आला असला, तरी गुरुवारी शहरातील बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ३१७ वर पोहोचली आहे. मात्र, आतापर्यंत चार हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून ३१९ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.सध्या शहरातील ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शहरातील नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नसल्याने शहरातील कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या