शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

coronavirus: प्रकाशकांचा ई-दिवाळी अंकांवर भर, कोरोनामुळे प्रकाशकांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:56 IST

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशकांनी छापील दिवाळी अंकाबरोबर डिजिटल म्हणजेच ई-दिवाळी अंकावरही भर दिला आहे.

ठाणे : दिवाळीत वाचकांना बौद्धिक मेजवानी मिळावी म्हणून दिवाळी अंक प्रसिद्ध होत असतात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशकांनी छापील दिवाळी अंकाबरोबर डिजिटल म्हणजेच ई-दिवाळी अंकावरही भर दिला आहे. काही प्रकाशक आॅडिओ दिवाळी अंक ही संकल्पनादेखील अमलात आणण्याच्या विचारात आहेत.जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे सध्या सारेच काही बदलले आहे. यामुळे आता डिजिटलचा पर्याय समोर आला आहे. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची सांस्कृतिक/ साहित्यिक परंपरा आहे. ती अखंडपणे सुरू आहे. दिवाळी जवळ आली की, वाचकांना दिवाळी अंकांचे वेध लागतात. अनेक प्रकाशन संस्थांचा ते काढण्याकडे कल असतो. महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास ३५० हून अधिक दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. सध्या कोरोनामुळे सगळीकडे अनिश्चितता आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख दिवाळी अंक सोडले, तर काही अंक छापले जातील की नाही, अशी शंका प्रकाशकांनी व्यक्त केली आहे. वितरण, जाहिराती या साऱ्यांचाच मोठा प्रश्न आहे. तरीही, महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशक दिवाळी अंक प्रकाशित करण्यावर ठाम आहेत, पण त्याचबरोबर आर्थिक गणितं पाहता अंकांची पाने कमी केली जातील, छापील प्रतींची संख्याही कमी केली जाणार आहे. परंतु, जास्तीतजास्त वाचकांपर्यंत ते पोहोचावेत, यासाठी ते ई-दिवाळी अंकांवर भर देणार आहेत.आमचे दोन्ही दिवाळी अंक हे छापील स्वरूपात प्रसिद्ध करणार आहोत, पण ई-दिवाळी अंकाचाही विचार होईल. कुरिअर, पोस्ट सेवा सध्या नीट सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांना छापील लागतात, त्यांना छापील अंक दिले जातील. जाहिरातीही कमी होतील, त्याचे विचार करून नियोजन केले जाईल. तरीही, महाराष्ट्रात नामवंत दिवाळी अंक प्रकाशित होतील, असे वाटते.- अशोक कोठावळे, संपादक/ प्रकाशकछापील स्वरूपातील अंकांबरोबर आमचा यंदा डिजिटलवरही भर असेल. प्रकाशन संस्थांचा व्यवसाय कोलमडला आहे. दिवाळी अंकांचा प्रचार नीट झाला, तर विक्री होऊ शकते. यंदा जाहिरातीही मिळणार नाहीत. त्यामुळे प्रती कमी छापणार आणि पानांची संख्याही कमी असेल. तसेच, ई-अंक हा कमीतकमी किमतीत देऊन जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचविणार. ई-दिवाळी अंकाबरोबर आॅडिओ दिवाळी अंकाचाही विचार आहे.- निलेश गायकवाड, प्रकाशकयंदा दिवाळी अंकांना जाहिरात मिळणार नाही. त्यामुळे ते प्रसिद्ध करू की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.- बाळ कांदळकर, संपादकई-दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. प्रती, पानांची संख्या कमी होईल. जाहिराती कमी मिळतील किंवा मिळणारच नाही, पण अंक प्रकाशित करणार हे नक्की.- मोनिका गजेंद्रगडकर, संपादिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDiwaliदिवाळी