शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांना पावभाजीचा आस्वाद; ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:38 IST

हॉराईझन स्कुल आणि भाईंदरपाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटरमधील प्रकार

ठाणे  :  कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संसर्ग टाळण्यासाठी किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना महापालिकेच्या वतीने होराइझन स्कुलमध्ये ठेवले गेले आहे. त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून त्यांना भात, डाळ, भाजी, चपाती असा जेवणाचा मेन्यू देणे अपेक्षित असतांना चक्क त्यांना सोमवारी रात्रीच्या जेवणात तीन पाव आणि भाजी असा मेन्यू देण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पालिकेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.

ठाणे  महापालिकेच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना होराइझन स्कुल आणि भाईंदरपाडा येथे ठेवत आहेत. तसेच या ठिकाणी आणखी काही खोल्यांमध्ये लक्षण नसलेल्या कोरोना बाधीत रुग्णांनाही ठेवले गेले आहे. आधीच येथे सोई सुविधांची वाणवा असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. आता देखील भाईंदर पाडा येथील क्वॉरान्टाइन सेंटरमधील असुविधांचा व्हिडीओ वायरल झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी होराइझन स्कुलमध्ये जाऊन येथील रुग्णांची विचारपूस केली होती. तोपर्यंत सर्व सोयी चांगल्या प्रकारे पुरविल्या जात होत्या. परंतु आता मात्र सोईसुविधांची तर वाणवा आहेच, शिवाय सोमवारी रात्री तर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येथील रुग्णांना पोष्टीक अन्न देण्याऐवजी पाव भाजीचा मेनु देण्यात आला. त्यातही अवघे तीन पाव भाजीबरोबर देण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे पोटही भरले नाही. त्यामुळे काहींनी या मेनुचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर वायरल केला आहे. यावरुन आता भाजपने पुन्हा एकदा तोंडसुख घेत, महापालिका प्रशासन आणि शिवसेनेवर टिका केली आहे. पाव भाजी मेनु देऊन जर कोरोना बाधीत रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढत असेल तर आनंदच आहे, असा उपरोधीक टोला भाजपचे जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका