शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: डिस्चार्जनंतरही ४० दिवस ठेवला जातो रुग्णांचा ट्रॅक; रुग्णांच्या लुटीला बसला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:36 IST

ठाणे महापालिकेचा उपक्रम : महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता.

ठाणे : कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याचा ट्रॅक ४० दिवस ठेवला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. कोणता रुग्ण कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती दिवसांपासून दाखल आहे, याची माहितीही घेतली जात असल्याने कोविड हॉस्पिटलकडून जी सर्वसामान्य रुग्णांची लूट होत होती, तिलाही लगाम बसला असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता. ठाण्यात परिस्थिती अशी होती की, रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होत नव्हती. यामुळे रुग्णालयात वेळेवर पोहोचू न शकल्यानेदेखील अनेकांचा या कालावधीत मृत्यू झाला. रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना बेडदेखील उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जास्तीतजास्त नागरिकांना शोधून त्यांना क्वारंटाइन करणे, या कालावधीत प्रशासनाला शक्यच नव्हते. 

मात्र, जूनमध्ये डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर एकाही रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही तसेच सर्वांना वेळेवर उपचार मिळावे, याची विशेष दक्षता घेतली. यामुळे आता ठाण्यात पॉझटिव्ह दर हा पाच टक्क्यांवर आला आहे. 

असा ठेवला जातो ट्रॅकएखाद्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर ४० दिवसांपर्यंत त्याचा ट्रॅक ठेवून त्याची नियमितपणो चौकशी केली जाते. तो आणखी कोणाच्या संपर्कात आला का, याचीदेखील माहिती घेतली जात असून दुसरीकडे १० दिवस त्यानंतर ११ ते १५ दिवस, २१ ते ३० दिवस आणि ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस अशा टप्प्यांमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचीदेखील नियमितपणो चौकशी केली जाते. जर रुग्ण जास्त दिवस उपचार घेत असेल, तर रुग्णालयाला त्याची कारणोदेखील विचारली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका