शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रुग्णांचा आलेख येतोय खाली, विपीन शर्मा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:59 IST

coronavirus News: गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, परंतु असे असले, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.

ठाणे - गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे, परंतु असे असले, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. उलट गेल्या काही दिवसांत ऑगस्ट महिन्यापेक्षाही रुग्णांची संख्या कमी असल्याने येत्या आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट हा सात टक्क्यांपेक्षाही कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला, परंतु सिरो सर्व्हेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून रुग्णांची संख्या आणखी कशी नियंत्रणात येईल, यावरच सुरुवातीपासून भर दिला जास्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दिवाळी सणानंतर इतर राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर पुन्हा लॉकडाऊन होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ठाण्यात टेस्ट करण्याचे प्रमाण हे दररोज पाच हजारांच्या वर असूनही पॉझिटिव्ह येणाऱ्याचे प्रमाण हे दोन टक्के इतके आहे. ते सध्या तरी स्थिर असल्याने ठाण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शर्मा यांनी आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर ऑगस्टपर्यंत केवळ कोरोनावर नियंत्रण ठेवणे, तसेच इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वाधिक टेस्टवर भर दिला असल्याने ठाण्यात आजघडीला कोरोना नियंत्रणात आहे.ठाण्यात मे महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट १४.९० टक्के होता. त्यानंतर  हा आलेख सतत उंचावतच होता. जूनमध्ये १९.४१ टक्के तर जुलैमध्ये २०.८४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. मात्र, जुलैमध्येच शर्मा यांनी टेस्टिंगवर भर देऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यानंतर जुलैमध्ये असलेला २०.८४  टक्के पॉझिटिव्हिटी रेट डिसेंबर महिन्यात ७.६२ टक्क्यांवर आला असून, आठवडाभरात तो ७ टक्क्यांपेक्षाही कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे