शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 02:37 IST

CoronaVirus Thane News: शनिवारी ३२ जणांचे मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी एक हजार ५५१ नवे रुग्ण आढळल्यामुळे आतापर्यंत एक लाख ८० हजार ६९ रुग्णसंख्या झाली आहे. तर, ३२ जणांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या चार हजार ५५९ वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली.ठाणे शहर परिसरात ४०२ रुग्ण नव्याने सापडल्याने आतापर्यंत ३७ हजार ९७५ रुग्णांची नोंद झाली असून आठ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार १८ नोंदवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २७७ नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला.उल्हासनगरात नवे ६२ रुग्ण सापडले तर तीन मृत्यू झाले. येथे आतापर्यंत नऊ हजार ३४९ रुग्णसंख्या झाली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात २८ बाधित आढळले असून एका जणाचा मृत्यू झाला. मीरा-भार्इंदरमध्ये २०० रुग्णांसह सात मृत्यूची नोंद झाल्याने शहरात मृतांची संख्या ५८७ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६८ रुग्ण सापडले असून एकाही मृताची नोंद नाही. बदलापूरमध्ये ६६ रुग्णांचा शोध नव्याने लागल्यामुळे आता बाधित सहा हजार ३३६ झाले आहेत.जिल्ह्यात २६ जणांचा मृत्यूअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ३६४ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ४८ हजार ०३८ वर पोचली आहे. दिवसभरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या १३२८ आहे तर, आतापर्यंत ४२ हजार ७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वसई-विरारमध्ये १७१ नवे रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात १७१ नवीन रुग्ण आढळले, मात्र त्याच वेळी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २०३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या २३ हजार २२९ वर पोहोचली आहे.नवी मुंबईत ३९९ रूग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात शनिवारी दिवसभरात ३९९ रूग्ण वाढले आहेत. एकूण रूग्णांची संख्या ३७८१७ झाली आहे. ३१५ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३३३५३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या